मराठा तरुणांनी नोकऱ्या मागणारे नव्हे, तर नोकऱ्या देणारे बनावे : मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे | ‘मराठा, बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आमचे सरकार प्रामाणिक आणि गांभीर्याने प्रयत्न करीत असून ही स्व. अण्णासाहेब पाटील यांना खरी श्रद्धांजली असणार आहे’ असे मत मुख्यमंत्री देंवेन्द्र फडणवीस यांनी ठाणे येथे व्यक्त केले. तसेच ‘मराठा तरुणांनी नोकऱ्या मागणारे नव्हे, तर नोकऱ्या देणारे बनावे’ असे म्हणुन मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील तरुणांना उद्योग धंद्यामधे येण्याचे आवाहन केले. माथाडी कामगारांचे आराध्य दैवत असलेल्या स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते माथाडी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित मेळाव्यास मुख्यमंत्री संबोधित करीत होते.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर आम्ही त्याला अनुरुप कालबद्ध कार्यक्रम तयार करीत आहोत. मराठा समाजातील तरुणांनी केवळ नोकऱ्या मागू नयेत, तर नोकऱ्या देणारे बनावे यासाठी आम्ही गेले काही वर्षे निष्क्रिय असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला ५०० कोटी रुपये देऊन पुनरुज्जीवित केले आहे. ‘प्रश्न आमच्या काळात निर्माण झालेले नाहीत. परंतु, त्यावर उत्तर शोधून मार्ग काढण्यासाठी आम्ही सकारात्मक पावले उचलली आहेत. आमच्या प्रयत्नांना निश्चित यश मिळेल. आमचे सरकार प्रश्नांपासून पळ काढणारे नसून प्रतिसाद देणारे आणि प्रश्नांना उत्तरे शोधणारे आहे’ असेही मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले.

याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील तसेच उपाध्यक्ष संजय पवार यांच्या पदांना अनुक्रमे कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाचा दर्जा देत असल्याची घोषणा केली.

Leave a Comment