विशेष प्रतिनिधी । देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी नागरिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. आता कसं वाटतंय.. गोड गोड वाटतंय.. अशा घोषणा यावेळी नागरिकांनी देत एकप्रकारे निषेध आणि आनंद दोन्ही व्यक्त केला.
फडणवीस सरकार शेतकरी आणि कामगारविरोधी असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. त्यामुळं मुख्यामंत्र्यांनी राजीनामा देताच नागरिकांनी एकच जल्लोष साजरा केला. राज्याचा विकास केल्याचे ढोल हे सरकार बडवत होते. परंतु राज्यात कसलाही विकास झाला नाही. या सरकारने विकासाचा आभास निर्माण केला. जनतेची फसवणूक करणारे हे सरकार आहे. असं म्हणत नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर आंनद व्यक्त केला.
राज्यात १९७२पेक्षा भीषण दुष्काळ असताना मुख्यमंत्री आणि सरकारचे मंत्री कुठे होते? अशा प्रश्नावर नागरिक मुख्यमंत्र्यांवर खार खाऊन होते. त्यामुळं मुख्यमत्र्यांनी राजीनामा देताच नागरिकांनी फटाके फोडत जल्लोष केला.