कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड । सातारा जिल्ह्यात क्रीटीकल पेशंटची संख्या मोठी आहे. त्याप्रमाणात ऑक्सीजन, व्हेंटीलेटर तसेच बेड कमी आहेत. तर रुग्णांच्या मृत्यू प्रमाणही जिल्ह्यातील वाढले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने स्टेडीयमध्ये 400 बेडचे कोवीड हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्तावही राज्य शासनाकडे पाठवला आहे. मात्र राज्य सरकारने तात्काळ याची दखल घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यात रुग्णानांना बेड मिळत नसतील तर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात यापूर्वी 18.50 टक्के इतका पॉझिटिव्हचा दर होता. तो गत सात दिवसांत 22 टक्क्यांवर गेला आहे. राज्याच्या तुलनेत हा दर वाढलेला असल्याने याठिकाणी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे ना. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ना. फडणवीस म्हणाले, साताऱ्यात कोरोना पॉझिटीव्हचा रेषो वाढत असल्याने मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. जिल्ह्यात सध्या दिवसाला 500 आरटीपीसी टेस्ट होतात. त्या वाढवून 1 हजार ते बाराशे होणे गरजेचे आहे. याचबरोबर अँटीजन टेस्टही वाढविल्या पाहिजेत. यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होणार आहे. राज्य शासनाने सर्व कोरोना रुग्णांना रेमडिसीवर इंजेक्शन देणार असल्याचे सांगितले होते. मात्र काही दिवसांपासून खासगी रुग्णालयांना दिले गेले नाही. कोरोना संसर्गाच्या क्रिटीकल स्टेजमधून आपण सध्या चाललो आहे. राज्यात दररोज सुमारे 14 हजार बाधित आढळत आहेत याकडे राज्य शासनाने गांभीर्याने बघणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
कराड हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. तालुक्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यामुळे या तालुक्याकडे अधिक लक्ष देेणे गरजेचे आहे. उपचारासाठी आणखी व्यवस्था उभी करावी लागणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’