हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील विकासाचा पाया म्हणून पायाभूत विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच भविष्यातील मुंबई विकसित करण्याचे आश्वासन सुद्धा दिले. इंडिया ग्लोबल फोरमच्या वार्षिक गुंतवणूक समिट ‘NXT10,’ मध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर अत्यंत परखडपणे भाष्य केलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पायाभूत सुविधांच्या बाबतीत मुंबई लवकरच सर्वात प्रगत शहर होईल. “आम्ही 2014 पासून पायाभूत सुविधांमध्ये 30 बिलियन अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली आहे. मुंबई मेट्रो आणि कोस्टल रोडच्या माध्यमातून आम्ही मुंबईचे चित्र बदललं आहे. आता नवीन मुंबई विमानतळ आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक दरम्यान तिसरी मुंबई विकसित होईल. आणि हि भविष्यातील मुंबई असेल अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली. एवढच नव्हे तर भारताच्या आर्थिक विकासाचे नेतृत्व महाराष्ट्र करेल असेही फडणवीस यांनी म्हंटल.
एक काळ होता, जेव्हा फक्त काही राज्ये स्पर्धा करत असत पण आता अनेक राज्यामध्ये स्पर्धा वाढली आहे. परंतु असं असलं तरी आम्ही या गोष्टीचे स्वागत करतो, कारण काही झालं तरी आपण एकाच देशात आहोत. एखादी कंपनी गुजरात किंवा कर्नाटक किंवा दिल्लीला गेली तरी चांगलं आहे, कारण शेवटी तो आपलाच देश आहे. गुजरात, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश पेक्षा चांगले असलेले आमचे FDI चे आकडे महाराष्ट्रात गुंतवणुकदारांच्या विश्वासाची साक्ष देतात… असे प्रकल्प आहेत जे गुजरातमध्ये गेले आहेत, पण महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि कायम राहील. सुरक्षितता, मजबूत सामाजिक पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि शाश्वतता यावर लक्ष केंद्रित करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राच्या भविष्याची कल्पना केल्याचे फडणवीस म्हणाले,