व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शिंदेंच्या नाराजीने राजकीय घडामोडींना वेग; फडणवीस दिल्लीला रवाना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला असून शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे हे 25 आमदारांसह गुजरात मध्ये आहेत. काल रात्री उशिरापासून शिंदे गुजरात मध्ये आहेत. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत.

देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील एकूण राजकीय घडामोडी आणि विधानपरिषद निवडणूकीत मिळवलेला विजय याबाबत ते दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनंतर ऑपरेशन लोटस चा प्रयत्न भाजपकडून होऊ शकतो. त्यादृष्टीने फडणवीसांची दिल्लीवारी महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या सोबत 13 आमदार असण्याची शक्यता आहे. आज दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करतील. त्या पत्रकार परिषदेत च ठाकरे सरकारचे भविष्य कळेल.