हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोलीस आणि गिरणी कामगारांच्या घरांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. पोलिस वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 25 लाखांपेक्षा कमी किंमतीत घर देणार तसेच गिरणी कामगारांसाठी 50 हजार घरे उपलब्ध करून देणार अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
फडणवीस म्हणाले, पुनर्विकास प्रकल्पात बांधकाम खर्चात पोलिस कर्मचाऱ्यांना घर देण्याचा निर्णय देण्यात आला आहे. पूर्वी त्या घरांच्या किंमत 50 लाख ठरविण्यात आली होती. 50 लाख आणि 25 लाखातील घरे पोलिसांना परडवडणारे नाहीत. त्यामुळे त्याहीपेक्षा कमी किमतीत किमतीत घरे आपण देऊ. यासाठी काही अनुदान सरकारला द्यावे लागले तर ते पण देऊ आणि अतिशय नाममात्र दराने आपण पोलिसांना बीडीडी चाळीमध्ये घर मालकी हक्काने देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे असं फडणवीसांनी जाहीर केलं.
बीडीडी चाळीतील नागरिकांना 500 चौरस फुटाचे घर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. असं फडणवीस म्हणाले . यावेळी त्यांनी गिरणी कामगारांसाठीही घोषणा केली. गिरणी कामगारांसाठी घराची लॉटरी तात्काळ काढू आणि 50 हजार घर गिरणी कामगारांना उपलब्ध करून देऊ असं फडणवीस म्हणाले. तसेच म्हाडा पुनर्विकास प्रकल्पातील नागरिकांना 25 हजार रुपयांपर्यंत भाडे देण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला.