देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाबाहेर!! नेमका काय असेल रोल??

Sadabhau Khot Devendra Fadnavis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा करून मोठा मास्टरस्ट्रोक खेळला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज एकत्रित पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. मात्र यावेळी आपण संपूर्ण मंत्रिमंडळाच्या बाहेर असेल अस सांगत फडणवीसांनी सर्वाना बुचकाळ्यात टाकले.

एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील आणि मी स्वतः मंत्रिमंडळाच्या बाहेर असेल अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. मी सरकार बाहेर असेल पण हे सरकार योग्य प्रकारे चाललं पाहिजे ही जबाबदारी माझी असेल. या सरकारला माझी साथ आणि समर्थन असेल अस फडणवीस म्हणाले. फडणवीस हेच या सरकारचे रिमोट कंट्रोल असू शकतात.

दरम्यान, मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे. फडणवीस यांनी मोठ्या मनाने बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. त्यांच्या इतका मोठ्या मनाचा माणूस राज्याच्या विकासासाठी आमच्यासोबत आहेत असेही एकनाथ शिंदे म्हणाले.