हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्या अयोध्येतील राम मंदिराचे उदघाटन (Inauguration of Ram Temple) पार पडत आहे. मात्र या मंदिराच्या उद्घटनावरून राजकीय आरोप प्रत्यारोप यापूर्वीच सुरु झाले आहेत. बाबरी मशिदीचा ढाचा पाडताना आपण तिथे उपस्थित होतो असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने करत असतात तर दुसरीकडे तुमचं तेव्हा वय तरी होता का? तुमच्या वजनानेच बाबरी पडली असेल असा खोचला टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी एक फोटो ट्विट करत (Devendra Fadnavis Shared karsevak old Photo) उद्धव ठाकरेंची बोलती बंद केली आहे.
फडणवीस यांनी ट्विट करत म्हंटल, जुनी आठवण… नागपूरहून प्रकाशित होणार्या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे… नवभारत परिवाराचा मी अतिशय आभारी आहे.
जुनी आठवण…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 21, 2024
नागपूरहून प्रकाशित होणार्या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र.
छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत… pic.twitter.com/v3NFbCSY1v
यापूर्वीही केला होता दावा –
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सुद्धा आपण बाबरी मशीद पाडली तेव्हा त्याठिकाणी होतो असा दावा केला होता. राम मंदिर आंदोलनात मी तुरुंगात गेलो होतो, मात्र तेव्हा तुम्ही आणि तुमची शिवसेना कुठे होती असा सवाल करत फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधला होता. त्या आंदोलनावेळी मला बदायू येतील तुरुंगात ठेवले होते. परंतु शिवसनेनेचे लोक त्याठिकाणी कुठेच दिसली नाहीत असं फडणवीसांनी यापूर्वी म्हंटल होत. आज तर त्यांनी थेट फोटो शेअर करत पुरावाच दाखवला आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून यावर काय उत्तर येणार हे आता पाहावं लागणार आहे.