नैतिकता म्हणून फडणवीसांनी राजीनामा द्यावा; सुषमा अंधारे यांची मागणी

0
81
Sushma Andhare And Fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून या हत्येबाबत संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. तसेच, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सरकारवर आणि सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच, घडलेल्या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

सुषमा अंधारे यांची पोस्ट

सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला सभागृहाच्या पटलावर आमदार सुरेश सुद्धा यांनी दिलेली माहिती जशास तशी फोटो बघताना दिसत आहे. याचा स्पष्ट अर्थ सुरेश धस यांच्याकडे माहिती भाजपचे गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आली होती. आरोपीबद्दल खडान्खडा माहिती असताना सुद्धा फडणवीसांनी जाणीवपूर्वक पक्षीय अजेंडा राबविण्यासाठी मौन बाळगले.

त्याचबरोबर, “सगळी माहिती फोटो व्हिडिओ हाताशी असून सुद्धा अडीच तीन महिने देशमुख कुटुंबीय आणि महाराष्ट्राच्या भावनांशी खेळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी आधी नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला हवा. धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा नैतिकता म्हणून नाही तर अपरिहार्यता म्हणून घेतला आहे.” असे सुषमा अंधारे यांनी म्हणले आहे.

पुढे बोलताना, या राजीनामासाठी जो वेळ लागला तो वेळ देवेंद्र फडणवीस यांनी हाताशी माहिती असताना सुद्धा सर्व आरोपींना वाचवण्यासाठी घेतला आहे हा उघड अर्थ आहे. असा आरोप त्यांनी लावला आहे.

https://www.facebook.com/100000324369123/posts/pfbid0WzNAGk1SGVaxxQcfPpagtuhqG7y2zq2CdCHtsxwiMYEGv1ciebFWAwWKdnAkfipXl/?app=fbl

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे या हत्याप्रकरणावेळीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे त्यावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांच्यावर देखील कटोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यामुळे आता यावर सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वसामान्यांपासून राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.