40 वर्षांनंतर शरद पवार रायगडावर गेले; फडणवीसांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवारांमुळे (Ajit Pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) रायगडावर जावं लागलं. शरद पवार तब्बल 40 वर्षांनंतर शरद पवार रायगडावर गेले असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निशाणा साधला आहे. आज शकलो रायगडावर शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षाचे नवीन चिन्ह असलेल्या तुतारीचे अनावरण करण्यात आलं होते. यावरून फडणवीसांनी पवारांना टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की, 40 वर्षांनंतर शरद पवार साहेब शेवटी रायगडावर गेले. अजितदादांना एका गोष्टीचं क्रेडिट तर द्यावं लागेल. अजितदादांमुळे शेवटी 40 वर्षानंतर पवार साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी जावं लागलं. आता तुतारी कुठे वाजते, कशी वाजते, किती वाजते हे आपल्याला भविष्यात दिसेलच,” असे ते म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागावाटपाबाबत विचारलं असता फडणवीस म्हणाले, जागा वाटपासंदर्भात आमची एक बैठक समाधानकारक झाली आहे. येत्या काळात आणखी काही बैठका घेऊन आणि लवकरात लवकर जागावाटप आम्ही करू. दक्षिण मुंबईत राहुल नार्वेकर यांचे नाव समोर येत आहे याबाबत छेडलं असता फडणवीस म्हणाले, राहुल नार्वेकर असतील किंवा इतर कोणी यांच्या चर्चेवर नाव निश्चित होत नसतात. यामागे एक प्रोसेस असते. ती प्रोसेस पूर्ण झाल्यावर ज्यांची नावे पुढे येतील ती निश्चित तुम्हाला सांगण्यात येईल.

दरम्यान, यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शरद पवारांवर टीका केली होती. मी स्वत: शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांना प्रश्न केला होता. तुम्ही भाषण करताना फुले, शाहू यांचे नाव घेता छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव का घेत नाहीत असा प्रश्न आपण शरद पवार यांना मुलाखतीच्या वेळी केला होता. छत्रपतींचं नाव घेतल्यावर मुस्लिमांची मते जातात, अशा संभ्रमावस्थेत त्यांनी इतकी वर्ष काढली आणि आता त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली असं म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांवर हल्लाबोल केला होता.