हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Go First Airline : बेंगळुरू विमानतळावरून 55 प्रवाशांना न घेता विमान उड्डाण केल्याप्रकरणी DGCA अर्थात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी निष्काळजीपणा दाखवल्याबाबत या नियामकाकडून Go First Airline ला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
हे जाणून घ्या कि, Go First Airline च्या फ्लाइटने 9 जानेवारी रोजी बेंगळुरू विमानतळावरील बसमधून 55 प्रवाशांना न घेताच उड्डाण केले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या प्रवाशांनी ट्विटरवर संबंधित एअरलाइन्सकडे विचारणा केली. यावेळी अनेकांनी पंतप्रधान कार्यालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना ट्विटमध्ये टॅग देखील केले. या घटनेनंतर विमान वाहतूक नियामकाकडून विमान कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
DGCA ने फेटाळली याचिका
एका निवेदनात, DGCA ने म्हटले आहे की, “सूचनेला उत्तर म्हणून GoFirst ने दिलेल्या माहितीनुसार, टर्मिनल को-ऑर्डिनेटर, व्यावसायिक कर्मचारी आणि प्रवाशांच्या बोर्डिंग संदर्भात क्रू मेंबर्स यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ही घटना घडली.” नियामकाने पुढे सांगितले की,” यामध्ये इतर त्रुटी देखील होत्या. हे सर्व पाहता Go First Airline ला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.”
संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
या घटनेतील बेंगळुरू विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांपैकी एकाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की,” फ्लाइट नंबर G8 116 (BLR – DEL) ने प्रवाशांना संगत न घेता उड्डाण केले! निष्काळजीपणा पहा, बसमधील 50 हून जास्त प्रवाश्यांना विमानतळावरच सोडून देण्यात आले. @GoFirstairways झोपेत काम करत आहे का??? Go First Airline
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flygofirst.com/
हे पण वाचा :
LIC च्या योजनेमध्ये गुंतवणूक दरमहा मिळवा 1000 रुपयांची पेन्शन !!!
Jio कडून कमी किंमतीत भरपूर डेटा देणारे 2 रिचार्ज प्लॅन लॉन्च, जाणून घ्या या प्लॅनचे अतिरिक्त फायदे
Pension Scheme : केंद्र सरकार देत आहे दरमहा 20,000 रुपयांची पेन्शन, कसे ते जाणून घ्या
Gram Suraksha Yojana द्वारे दररोज 50 रुपयांची बचत करून मिळवा 35 लाख रुपये
Multibagger Stock : चॉकलेट बनवणाऱ्या ‘या’ कंपनीच्या शेअर्सने 1 महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे केले तिप्पट