सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 810 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 19 हजार 082 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या 98 हजार 523 आहे. तर जिल्ह्यात एकूण 77 हजार 026 बरे झाले ली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 2388 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसांत कोरोमुक्तीचा व बाधितांचा आकडा जवळपास समसमान असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी दिवसभरात 1 हजार 540 रूग्ण बरे होवून घरी गेले ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. मात्र मंगळवारी रात्री नव्याने आलेल्या 1 हजार 810 बांधितांच्यामुळे जिल्ह्याची परिस्थिती जैसे थे आहे. तर सोमवारी दिवसभरात 33 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाल आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा