हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे बलात्काराच्या प्रकरणात अडचणीत आले असून विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. परंतु सध्या तरी धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेस कडून अभय मिळालं असून त्यांच्या राजीनामा काढून घेतलेला नाही. त्यातच आत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंडेंचा उल्लेख ओबीसी नेते असा करून भाजपचीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की धनंजय मुंडे हे ओबीसी समाजाचे नेते आहेत. भाजप ओबीसी समाजाच्या नेत्यांमागे उभी राहत नाही, मात्र राष्ट्रवादी मुंडे यांचा या प्रकरणात दोष नसेल तर पाठीमागे ताकदीनिशी उभा राहील. हे वक्तव्य करून पाटील यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचं काम केलं आहे. भाजप नेते ओबीसींचा केवळ मतांसाठीच वापर करत असल्याचं सांगतानाच भाजप ओबीसीविरोधी आहे, हे सूचवण्याचा प्रयत्नही पाटील यांनी या निमित्ताने केला आहे.
ओबीसींना जवळ करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न ??
भाजप ओबीसींना वाऱ्यावर सोडते पण आम्ही ओबीसींच्या पाठी उभे राहतो, असं सांगून मुंडेंच्या निमित्ताने ओबीसींना जवळ करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मुंडे यांना मानणारा राज्यात मोठा वर्ग आहे. तसेच ते ओबीसींचा चेहरा आहेत. खडसेही राष्ट्रवादीवासी झाल्याने राष्ट्रवादीला ओबीसींची फळी मजबूत करायची आहे. त्यामुळेच खडसे असो की मुंडे या ओबीसी नेत्यांच्या पाठी भाजप नव्हे तर राष्ट्रवादीच उभी राहते असे सूचवून पाटील यांनी ओबीसींना योग्य ते संकेत दिले आहेत
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’