ताई काळजी घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच; धनंजय मुंडेंचे बहीण पंकजाताईंना आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. दरम्यान पंकजा मुंडे यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. “प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई,” अशी पोस्ट धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर शेअर केली आहे.

धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट 

“पंकजाताई, #COVID19 विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई,” अशी पोस्ट धनंजय मुंडेंनी टाकली आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2980704572159153&id=1454902244739401

पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण

दरम्यान, माझ्या कोरोनाचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून स्वत:ला विलग केलं होतं. मी गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याच वेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल. त्यामुळे या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. तसेच काळजी घ्या, असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.