सप्टेंबर महिन्यात येणार कोविड-19 ची तिसरी लाट; असेल दुसऱ्या लाटेपेक्षा तीव्र: टास्कफोर्सचे सदस्य डॉ. सशांक जोशी यांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोविड-19 ची दुसरी लाट सद्ध्या हाहाकार करून सोडत आहे. यातच काही तज्ञ मंडळी कोविडच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात बोलत आहेत. अंदाज व्यक्त करत आहेत. तज्ञांच्या मते सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात कोव्हिड-19 संसर्गाची तिसरी लाट येईल. ही लाट पहिल्यापेक्षा जास्त तीव्र असेल. पण, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत गंभीर नसेल. महाराष्ट्राच्या कोव्हिड-19 टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी हा इशारा दिला आहे. यामुळे महाराष्ट्राने यासाठी तयार राहावे लागेल, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

दुसरी लाट इतकी भयानक असताना सगळीकडे थैमान माजवून सोडले आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा सामना करताना आरोग्ययंत्रणा कोलमडून गेली. सगळीकडे ऑक्सिजन, इंजेक्शन आणि औषधांचा तुटवडा जाणवत आहे. लसीकरण होणे महत्वाचे आहे. पण लसीसाठी लागणारा कच्चा मालाची असलेली अडचण पाहता लसीकरणाचे उद्दिष्ट कसे पूर्ण होईल यावर चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे जनतेचे लसीकरण होणे महत्वाचे आहे. त्यातच, तज्ज्ञांनी तिसरी लाट येण्याचा इशारा दिलाय. यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांनी वेळीच सावध होऊन याबाबत उपाय योजना करण्याचे आणि तिसऱ्या लाटेसाठी तयार राहण्याचे तज्ज्ञांकडून सरकारला इशारा दिला जात आहे.

याबाबत बोलताना डॉक्टर शशांक जोशी म्हणतात की, ‘कोव्हिड-19 ने देशभरात हाहाकार माजवलाय. ही लाट नाही, त्सुनामी आहे’. अशा गंभीर शब्दात डॉक्टर परिस्थितीचं वर्णन केले आहे. देशात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनासंसर्गाने विक्राळ रूप धारण केलंय. आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. कोविडणे सगळीकडे थैमान घातलेले दिसून येत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही या तिसऱ्या लाटेसंदर्भात चिंता व्यक्त केली असून याबात वेळीच सरकार सावध होऊन तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी लागावे लागणार असल्याचे राजेश टोपे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Leave a Comment