हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Dhananjay Munde Resignation – सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील चार्जशीट मधील फोटो समोर आल्यानंतर अखेर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंडेंचा राजीनामा स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे सुपूर्त करण्यात आला आहे. देशमुखांच्या हत्येचे थरकाप उडवणारे फोटो बाहेर आल्यावर सर्वांच्याच भावना अनावर झाल्या होत्या.
देवगिरी बंगल्यावर राजीनाम्यासंदर्भात बैठक –
काल रात्री देवगिरी बंगल्यावर 8.50 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये मुंडेंच्या राजीनामाबद्दल (Dhananjay Munde Resignation) दोन तास बैठक सुरु होती. या बैठकीत धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल पटेल हे सर्व देखील उपस्थित होते. या बैठकीत राजीनाम्यासंदर्भात चर्चा झाल्यानंतर अखेरी धनंजय मुंडें यांनी आपला पदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा (Dhananjay Munde Resignation ) –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या (Dhananjay Munde Resignation) संदर्भात माहिती दिली आहे. “आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे. पुढील कारवाई करता हा राजीनामा राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारुन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं आहे” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
थरारक फोटो आणि व्हिडीओ समोर –
काल रात्री मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना क्रूरपणे मारलेले थरारक फोटो आणि व्हिडीओ समोर आले. त्याचसोबतच वाल्मिक कराड आणि सुनील शिंदे यांच्यातील फोनवरील संवाद देखील समोर आला आहे. ज्यामध्ये असे स्पष्ट होते कि , वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्येचे मुख्य आरोपी आहे. पण या क्रूर हत्येचे फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यावर लोकांच्या भावना अनावर झाल्या , तसेच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना माध्यमांशी बोलताना अश्रू अनावर झाले. त्याचसोबत आपल्या भावाच्या निर्गुण हत्येचा न्यायनिवाडा लवकरात लवकर झालाच पाहिजे असे देखील ते म्हणाले.