हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन Dhananjay Munde To join BJP । एकीकडे माणिकराव कोकाटे प्रकरणामुळे आधीच अडचणीत आलेल्या अजित पवारांना आणखी एक मोठा झटका बसण्याची शकयता आहे. महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता दादा गटातील पहिल्या फळीतील नेता भाजपचे कमळ हाती घेणार अशा चर्चा रंगल्या आहेत. हा नेता म्हणजे धनंजय मुंडे.. होय अजित पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे धनूभाऊ लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असा खळबळजनक दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
धनुभाऊंनी घेतली अमित शाह यांची भेट (Dhananjay Munde To join BJP)
धनंजय मुंडे यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. एकीकडे माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वारंट निघालं असतांना ज्या टायमिंगवर धनंजय मुंडे यांनी अमित शहा यांची भेट घेतली ते टायमिंग खूप महत्वाचं आहे. याच पार्श्वभूमीवर करुणा मुंडे यांचा दावा नक्कीच दुर्लक्षित करण्यासारखा नाही. करुणा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडे यांच्यावर सध्या अनेक आरोप आहेत. वाल्मीक कराड प्रकरणामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. वाल्मीक कराड याला या संपूर्ण प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी आणि सुटका करून घेण्यासाठी धनंजय मुंडे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील (Munde To join BJP) . त्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे धनंजय मुंडे हे दिल्लीला गेले असल्याची माहिती करुणा मुंडे यांनी दिली.
अजितदादांना झटका –
धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे खास म्हणून ओळखले जातात. अजित पवारांनी प्रत्येक वेळी धनंजय मुंडेंना साथ आणि पाठबळ दिले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असतानाही धनंजय मुंडे हे थोरल्या पवार साहेबांऐवजी अजित पवारांसोबत जास्त जवळचे झाले. पहाटेच्या शपथविधी वेळेही धनंजय मुंडेंचा फोन नॉट रिचेबल झाला होता. पुढे अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर धनूभाऊ दादांसोबत गेले. त्यामुळे अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध उभ्या महाराष्ट्राला माहिती आहेत. अशावेळी धनुभाऊंनी जर भाजपचे कमळ हाती घेतलं तर अजित पवारांसाठी हा सर्वात मोठा झटका मानला जाईल.




