बीड प्रतिनिधी | आज मंत्रालयात येण्यापासून अडवलं उद्या सरकारमधे येण्यापासूम अडवू असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपा नेत्या व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांना इशारा दिला. धनगर आरक्षणाबाबत पंकजा मुंडे यांनी एका भाषणात आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोवर मंत्रालयाची पायरी चढणार नाही असे विधान केले होते. मात्र त्याचा विसर पडून त्यांनी आज मंत्रालयाची पायरी चढली. यावर धनंजय मुंढे यांनी पंकजा यांच्यावर टिका केली.
‘मंत्र्यांनो, शब्दांचा खेळ करणे थांबवा आणि आरक्षण कधी देणार ते सांगा. आज आम्ही मंत्रालयात येण्यापासून अडवलं, उद्या सरकारमधे येण्यापासून जनताच तुम्हाला अडवेल’ असे म्हणत धनंजय मुंढे यांनी पंकजा यांना धारेवर धरले. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मुंढे यांनी आपली भुमिका मांडली आहे.
दरम्यान, परळी वैजनाथ येथील भाषणात पंकजा यांनी ‘धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मंत्रालयात प्रवेश करणार नाही, मंत्रालयाची पायरी चढणार नाही’ असे विधान केले होते. मात्र त्याचा विसर पडून त्यांनी आज मंत्रालयाची पायरी चढली. तेव्हा धनगर समाजाचे आमदार रामराव वडकुते यांनी पंकजा यांची मंत्रालयाच्या पायर्यांवर वाट अडवली आणि त्यांना जाब विचारला. ‘तुम्ही धनगर समाजाची फसवणूक करत आहात, २०१९ मधे जनता तुम्हाला मंत्रालयात येण्याची वेळच येऊ देणार नाही’ असे वडकुते म्हणाले.
'मंत्रालयात प्रवेश करु शकणार नाही’, 'मंत्रालयाची पायरी चढणार नाही'… मंत्र्यांनो ! शब्दांचा खेळ करणे थांबवा. आरक्षण कधी देणार ते बोला. नाहीतर आज आम्ही मंत्रालयात अडवलं, उद्या सरकारमध्ये येण्यापासून ही जनताच तुम्हाला अडवेल.
#परिवर्तनपर्व #परिवर्तनयात्रा #धनगर_आरक्षण
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 8, 2019