बीड प्रतिनिधी । परळीतील धनंजय विरुद्ध पंकजा लढतीवर सर्व राज्याचे लक्ष लागलेले असताना धनंजय यांनी मतमोजणीत मोठी आघाडी घेतली आहे. याच आघाडीतून धनंजय मुंडे समर्थक विजयापूर्वीच जल्लोष करत आहेत. धनंजय मुंडे यांनी आतापर्यंत १८ हजार मतदान घेत पंकजा पिछाडीवर टाकले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा विजय निश्चित असल्याचे सांगत कार्यकर्ते विजय साजरा करत आहेत.
परळीतील निवडणूक बहीण- भावाने प्रतिष्ठेची केली आहे. भाजपचे दिवंगत नेते आणि वडील गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा चालवणाऱ्या पंकजांची राजकीय प्रतिष्ठ पणाला लागली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीत आपला दबदबा निर्माण केलेले आणि विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणुकीत प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात या बहीण-भावांनी मतदारांना भावनीक आवाहन केलं. यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं. बहीण-भावात कोण बाजी मारणार याची फक्त परळीकरांनाच नव्हे संपूर्ण राज्याला उत्सुकता लागली. मात्र अंतिम निकाल लागल्यावरच परळीचा गड कोण राखणार हे कळेल.