पुणे | देशात रहायचं असेल तर भारत माता की जय बोललंच पाहिजे असे विधान केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे. ते पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 54 व्या परिषदेला संबोधित करताना बोलत होते. शनिवारी 28 डिसेंबर रोजी पुण्यात ही परिषद झाली.
प्रधान म्हणाले की, आज देशापुढे आव्हानं काय आहेत, एकीकडे नागरिकता मोजली जाणार की नाही. उधमसिंग, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस यांचे बलिदान निरर्थक जाईल. या देशाला आपण धर्मशाळा बनवणार आहोत का असे सवाल उपस्थित करत भारतात रहायचं असेल तर भारत माता की जय बोललंच पाहिजे असे मत धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले.
जगातील अनेक देशांमध्ये नागरिकत्व नोंदणीची तरतूद आहे, असे मत प्रधान यांनी व्यक्त केले. प्रधान म्हणाले की, रोजगाराची निर्मिती करणे हे आपल्यापुढील आव्हान आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसारख्या संघटनेने या समस्येवर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत