धावरवाडी ग्रामसभेत राडा : दारूच्या दुकानावरून जोरदार खडाजंगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | धावरवाडी (ता.कराड) ग्रामपंचायतीच्या हद्दीत बिअर बार व परमिट रूम ला परवानगी देण्यावरून ग्रामसभे दरम्यान दोन गट समोरासमोर आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सरपंच व ग्रामसेवक यांनी मलिदा घेऊन परवानगी दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून सुमारे शंभर ग्रामस्थांच्या सह्या असलेले निवेदन कराड गटविकास अधिकारी यांना देणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मंगळवार दि.५ रोजी सकाळी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. परंतु बारच्या परवानगी वरून वादविवाद वाढत गेल्याने सभा तहकूब केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

याबाबत उंब्रज पोलिसात तक्रार देण्यासाठी काही नागरिकांनी धाव घेतली असून परगावच्या माणसाला परवानगी कशासाठी देताय आणि गावातील माणसांना दारुडे बनवायचा ठेका सरपंच आणि ग्रामसेवकांनी घेतला आहे का असा आरोप नागरिकांनी केला असून गुपचूप ऑनलाईन सभेत परवानगी दिली असून ती बेकायदेशीर आहे यासाठी आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असून संबधित दोषींवर कारवाईची मागणी करणार असल्याबाबत ग्रामस्थ ठाम आहेत.

Leave a Comment