पोलीस ठाण्यासमोरच कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे ! बहिणीची भावाला बेदम मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – पुढील शिक्षणासाठी टीसी घेण्यासाठी आलेल्या मुलीला टीसी न देता, तु येथेच राहूण शिक्षण घे, असे म्हणत, मुलीला मामाकडे जाण्यास मज्जाव करत मुलीसह भावाला बहिणेने बेदम चोपले. चक्क एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यासमोरच घडलेल्या या फ्रि-स्टाईलमुळे पोलिस ठाण्यात मोठी खळबळ उडली. ही घटना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यासमोर घडली.

याविषयी अधिक माहिती अशी की, दहवीत शिकणारी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी गेल्या काही महिन्यापूर्वी बजाजनगर येथे आई रामकौर विलास जाधवकडे राहत होती. मात्र आईची वागणुक पसंत नसल्याने मुलगी मामाच्या गावी बेलगाव (ता.केज, जि.बीड) येथे गेली होती. ती मामा नकुस नरहरी टोणगे व आजी कमल नरहरी टोणगे यांच्याकडेच राहून पुढील शिक्षण घेणार होती. त्यासाठी ती टीसी घेण्यासाठी बजाजनगरात आली होती. मात्र तिला टीसी न देता, तू मामाकडे जाऊ नको. येथेच राहून शिक्षण घे, असा आग्रह तिची आई रामकौर जाधव हिने धरला होता. मात्र ती मामाकडे जाण्यावर ठाम होती.

दरम्यान यावर एकमत न झाल्याने मुलीसह आई रामकौर जाधव व मामा नकुस टोणगे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. ते पोलिस ठाण्यात आल्यांनतर ही त्यांच्यातील वाद सुरूच होता. हा वाद विकोपाला गेल्याने रामकौर हिने अल्पवयीन मुलीसह भाऊ नकुस टोणगे याला चपलाने बेदम चोपले. आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास चक्क पोलिस ठाण्यासमोर झालेल्या या फ्रि स्टाईलमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून सर्वाना ताब्यात घेतले.

Leave a Comment