Wednesday, March 29, 2023

केंद्रीय मंत्र्याचा ‘असाही’ साधेपणा ! भर रस्त्यात गाडी थांबवून साधला गावकऱ्यांशी ‘संवाद’

- Advertisement -

औरंगाबाद – आपल्या साधेपणा रांगडेपणासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ओळखले जातात. अनेकांनी ते बोलताना आपले वाटत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी रस्त्यावर बसून जेवण केल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आज सकाळी मुंबईहून रावसाहेब दानवे रेल्वेने जालन्याला पोहोचले. भोकरदनला जात असताना त्यांनी रस्त्यात गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली.

या प्रसंगी त्यांच्या भोवती लहान मुले जमा झाल्याचे पाहायला मिळाले. मंत्रीपदाचा आव बाजूला ठेवून सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याची कला दानवे यांच्यात आहे. एकाला तर त्यांनी मिठाई भरवल्याचे दिसत आहे. यावेळी त्यांनी सर्व प्रोटोकाॅल बाजूला ठेवले असल्याचे दिसले. आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये दानवे म्हणतात, की मुंबईहून रेल्वेने प्रवास करुन आज पहाटेच जालन्याला पोहोचलो. जालना ते भोकरदन प्रवासात, माझ्या गावी जाताना वाटेमध्ये लागणाऱ्या राजूर, लिंगेवाडी, बाभूळगाव येथील गावकऱ्यांशी संवाद साधला. तसेच गावकऱ्यांनी देखील आपली मते व्यक्त केली.

- Advertisement -

दिल्लीला असताना शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची गळाभेट घेतली होती. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.