Saturday, March 25, 2023

अमृता फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर विद्या चव्हाणांनी दिले ‘दोन’ शब्दात उत्तर; ट्विट करत म्हणाल्या…

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. तसेच ट्विट करीत निर्वाणीचा इशाराही दिला आहे. त्यानंतर विद्या चव्हाण यांनी फडणवीसांना दोन शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. ढोंगीपणाची उंची ! कोण बोलत आहे बघ?, असे चव्हाण यांनी म्हंटले आहे.

अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांना ट्वीट द्वारे नोटीस पाठवत कारवाईचा इशारा दिला. त्यावर विद्या चव्हाण यांनीही ट्विट करीत तसेच माध्यमांशी संवाद साधत प्रत्युत्तर दिले. सुरुवातीला चव्हाण यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ढोंगीपणाची उंची ! कोण बोलत आहे बघ?, असे म्हंटले आहे.

- Advertisement -

 

 

अमृता फडणवीसांनी काय केली आहे टीका –

अमृता फडणवीस यांनी विध्या चव्हाण यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकला असून याबाबत ट्विट करीत इशाराही दिला आहे. अमृता फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हंटले आहार की, आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल. तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! विद्या चव्हाण मानहानी नोटीस वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण !,

नेमके प्रकरण काय आहे ?

काल भाजप पदाधिकारी जितेन गजारिया याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्याने केलेल्या ट्विटमध्ये रश्मी ठाकरे यांची तुलना राबडीदेवींशी केली होती. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी निषेध नोंदवला. या प्रकरणी त्यांनी निषेध नोंदवत असताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस याचे नाव घेत त्यांच्यावरही निशाणा साधला. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा टाकत त्यांना नोटीस पाठवली आहे.