कोरोना काळात फूड डिलिव्हरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या ‘DID- 4’ फेम बिकी दासचा अपघात

0
43
Biki Das
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘डान्स इंडिया डान्स’ या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी डान्स शोचा माजी स्पर्धक बिकी दास याचा मोठा भीषण अपघात झाला आहे. तूर्तास त्याच्यावर कोलकात्याच्या एका रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बिकी दास हा ‘डान्स इंडिया डान्स’च्या सीजन ४ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार बिकी दासचा शुक्रवारी रात्री अपघात झाला असून या अपघातात तो अत्यंत गंभीर जखमी झाला आहे. यानंतर त्याला तातडीने रूग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले. बिकी एक उत्तम डान्सर आहे. मात्र कोरोना काळात त्याच्यावर फूड डिलिव्हरी करण्याची वेळ आली. कुटुंबाचे पोट भरण्यासाठी तो कोलकात्यात फूड डीलिव्हरी बॉयचे काम करत होता. अश्याच एका फूड डिलिव्हरी दरम्यान हा अपघात झाला असल्याचे वृत्त आहे.

DID ४ फेम बिकी दासचा शुक्रवारी रात्री दुचाकीवरून फूड डिलिव्हरीसाठी जाताना हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. ई टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ४ जून २०२१ शुक्रवार रात्री फूड डिलिव्हरी ऑर्डर वेळेत पोहोचवण्यासाठी तो त्याच्या बाईकवरून जात होता. या दरम्यान त्याचा हा अपघात झाला. त्याच्या बाईकला दुस-या बाईकने जोरदार धडक दिली. यामुळे हा अपघात घडून आल्याचे समोर येत आहे. इतकेच नव्हे तर या अपघातात बिकी अत्यंत जखमी झाला आहे. अपघातदरम्यान झालेल्या दुखापतीतील गंभीर बाब अशी कि बिकीच्या बरगड्या तुटल्या आहेत. तर अन्य अनेक ठिकठिकाणी गंभीर इजा झाल्या आहेत. बिकीची पत्नी संगीताने यासंदर्भात पोलिस तक्रार दाखल केली आहे.

२०१४ साली बिकीने ‘डान्स इंडिया डान्स ४’मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. या सीझनमध्ये श्याम यादव हा विजेता होता. तर बिकी दास हा सेकेन्ड रनरअप होता. बिकी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या डान्सचे प्रदर्शन करायचा. ‘सुपर डान्सर’मध्ये एका स्पर्धकाचा मेंटॉर म्हणूनही तो दिसला होता. काही दिवसांपूर्वीच ‘डान्स इंडिया डान्स’ या डान्सिंग रिऍलिटी शोला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने शोच्या पहिल्या सीझनचा विजेता व कोरिओग्राफर सलमानने याने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here