हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्याने हताश पतीने ऑक्सिजनसाठी पत्नी आणि मुलीला झोपवलं झाडाखाली; त्यानंतर झाले असे काही…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्वास घेण्यात अडचण आल्यामुळे एका व्यक्तीने आजारी पत्नी व मुलीला खासगी मेडिकल कॉलेजमध्ये नेले. तेथे दोघांनाही नकार दिल्याने त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली आणून खाली ठेवण्यात आले. माहिती मिळताच स्थानिक आमदार रोशनलाल वर्मा तेथे पोहोचले. ते म्हणाले की, प्रभारी सीएचसीशी बोलल्यानंतर त्या दोघांना रुग्णालयात प्रवेश देण्यात आला.

मोहल्ला बहादूरगंज, बरेली येथील ही घटना असून, पत्नी आणि मुलगी मुस्कान आजारी असल्याने पतीने सकाळी दोघांनाही हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन फिरत होते. श्वास घेण्यात त्रास होत होता. म्हणून त्यांनी त्या दोघांनाही सीएचसी येथे नेले पण तिथे ओपीडी बंद झाली होती. लोकांच्या सांगण्यावरून त्यांनी त्यांना खासगी मेडिकल कॉलेज येथे नेले पण तेथे फक्त कोविड रुग्णांनाच दाखल केले जाते असे सांगून त्यांना परतवण्यात आले.

इतरत्र ऑक्सिजन व उपचार मिळत नसल्यामुळे अनिल आपली पत्नी व मुलीसह तिल्हारला परतला. कोणीतरी त्यांना पिंपळाच्या झाडाखाली ऑक्सिजनसाठी झोपवायला सांगितले म्हणून पर्याय नसल्याने पतीने दोघांना पिंपळाच्या झाडाखाली ठेवले होते. काही वेळाने तिथे गर्दी होऊ लागली. माहिती मिळताच आमदार रोशनलाल वर्मा यांनी सीएचसी प्रभारी करण सिंह यांच्याशी बोलने केले. तसेच संपूर्ण प्रकरण डीएमला सांगितले. त्यानंतर प्रभारी सीएचसीने रुग्णवाहिका पाठविली. दोघांनाही खासगी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

You might also like