हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवसेंदिवस देशात कोरोनाव्हायरसची मोठ्या प्रमाणात प्रकरणे समोर येत आहेत. रोज येणाऱ्या एवढ्या केसेस बघून लोक घाबरून जात आहेत. 24 तासात देशात 3.14 लाखांहून अधिक नवीन कोरोना प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. एका दिवसात कोणत्याही देशातील संक्रमणाच्या इतक्या घटना हा नवीन विक्रम आहे. या प्रकरणांमध्ये, आतापर्यंत 1,59,30,965 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात सध्या कोरोनाची 22.91 लाखाहून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत.
यासह, काही राज्यांमध्ये लॉकडाउन आहे, तर काही राज्यांनी या आजाराशी सामना करण्यासाठी कर्फ्यू आणि कलम 144 चा अवलंब केला आहे. यासह कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने सामाजिक अंतराचे पालन करावे आणि मास्क वापरावेत यावर भर दिला आहे. दरम्यान तेलंगणामधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. लोकांना येथे मास्क घालणे सरकारने बंधनकारक केले. राज्य सरकारच्या आदेशानुसार जर कोणी मास्कशिवाय सापडला तर त्याला तुरूंगाचीही शिक्षा होऊ शकते. अशा परिस्थितीत स्वत: ला दंडापासून वाचवण्यासाठी एका व्यक्तीने भन्नाट आयडिया शोधली आहे ज्याची आजकाल चर्चा होत आहे.
Mekala Kurmayya can’t buy a mask-still wore one. Kurmayya who hails from Chinnamunugal Chad in Mahabubnagar district #Telangana came to mandal center for a pension wearing a bird-nest as a mask! Not the best-but he tried. Govts should distribute masks for those who can’t afford pic.twitter.com/NogkmgNr5n
— Revathi (@revathitweets) April 22, 2021
वास्तविक, या चित्रात तेलंगणा येथील व्यक्ती आपल्या तोंडावर पक्ष्याच्या घरट्याचा मास्क घातलेला दिसत आहे, कारण तो मास्क विकत घेऊ शकत नाही. म्हणूनच त्याने पक्ष्याच्या घरट्याचा मास्क परिधान केलेला आहे. असे सांगितले जात आहे की तेलंगणामध्ये राहणारे मेकला कुर्मया नावाची व्यक्ती व्हायरल होणाऱ्या चित्रात त्याच्या चेहऱ्यावर पक्ष्याच्या घरट्यांचा मास्क घातलेला दिसत आहे. हे चित्र @revathitweets नावाच्या ट्विटर हँडलवर शेअर केले गेले आहे.