हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 4K TV vs HD Smart TV : सध्याच्या काळात स्मार्ट टीव्हीचा ट्रेंड झपाट्याने वाढल्याचे दिसून येत आहे. कंपन्यांकडूनही बाजारात प्रत्येक श्रेणीतील टीव्ही देण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र आजकाल बाजारात इतके प्रकार उपलब्ध झाले आहेत की त्यामधून निवड करणे ग्राहकांसाठी डोकेदुखी झाली आहे. आपल्याला सतत नवीन HD TV किंवा 4K TV लाँच झाल्याचे ऐकायला मिळते. मात्र अशी फार कमी लोकं आहेत ज्यांना या दोघांमधील नेमका फरक माहिती आहे. तर आजच्या या बातमीमध्ये दोघांमधील फरक जाणून घेऊयात…
यामधील रिझोल्यूशन क्वालिटीद्वारे फोटोमधील पिक्सेलच्या संख्येचा संदर्भ मिळतो. एक पिक्सेल इतका लहान असतो की आपण ते उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. मात्र पुरेसे पिक्सेल एकत्र ठेवल्यानंतर संपूर्ण फोटो बनवता येतो. इथे हे जाणून घ्या कि, पिक्सल जितके जास्त तितका जास्त चांगला फोटो असेल आणि त्याचे रिझोल्यूशन जास्त असेल. 4K TV vs HD Smart TV
Full HD म्हणा किंवा 1080p किंवा 1920×1080 म्हणा हे सगळे एकसारखेच आहेत. ते सर्व एकच रिझोल्यूशन संदर्भित करण्याचे मार्ग आहेत. त्याचप्रमाणे, 4K टीव्हीचे रिझोल्यूशन 3840×2160 आहे. यामध्ये रिझोल्यूशन जितके जास्त असेल तितका पिक्चर शार्प होईल. 4K TV vs HD Smart TV
कोणता टीव्ही जास्त वीज खर्च करतो ???
रिझोल्यूशनच्या बाबतीत, हे सर्व किंमत, क्वालिटी आणि ऊर्जा कार्यक्षमता संतुलित करण्याबाबत आहे. Full HD (किंवा 1080p) खरेदी करण्यासाठी सर्वात स्वस्त रिझोल्यूशनपैकी एक आहे. या बहुतेक स्क्रीन छान दिसतात. मात्र जर आपल्याला वीज बिल कमी करायचे असेल तर 4K ऐवजी HD मॉडेल्स खरेदी करा. 4K TV vs HD Smart TV
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/televisions/~smart-tvs-/pr?sid=ckf%2Cczl
हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
EPFO आता परदेशातही देणार मोफत उपचार-पेन्शनसारख्या अनेक सुविधा, याचा लाभ कसा घ्याव ते पहा
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या
PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, कर्जावरील व्याजदरात केली वाढ