हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Guarantee-Warranty : जेव्हा आपण दुकानातून एखादी महागडी वस्तू खरेदी करायला जातो त्याच्या गॅरेंटी आणि वॉरंटी बाबतची माहिती विचारतो. अनेकांना या दोन्ही गोष्टी एक सारख्याच वाटतात. मात्र प्रत्यक्षात तसे नसते, या दोघांमध्ये खूपच फरक आहे. चला तर मग या दोघांमध्ये काय फरक आहे ते जाणून घेउयात…
गॅरेंटी काय असते ?
गॅरेंटी म्हणजे आपल्या प्रॉडक्टच्या गुणवत्तेची संपूर्ण जबाबदारी कंपनी घेते. जर त्यात एखादा लहानसा दोष आढळला तर कंपनी आपल्या मेकॅनिकला ते दुरुस्त करण्यासाठी पाठवते. मात्र जर जेव्हा मोठा दोष आढळला तर कंपनी आपले प्रॉडक्ट परत घेते.
वॉरंटी म्हणजे काय ?
वॉरंटी म्हणजे कोणताही दोष असला तरीही कंपनी कोणत्याही परिस्थितीत आपले प्रॉडक्ट परत घेत नाही. त्याऐवजी,कंपनी आपल्या मेकॅनिकला ते दुरुस्त करण्यासाठी तुमच्या घरी पाठवते. तसेच काही ठराविक स्पेयर पार्ट रिप्लेस करून देते.
प्रॉडक्ट परत घेतल्यामुळे कंपनीचे जास्त नुकसान होते ज्यामुळे आजकाल अनेक कंपन्या आपल्या प्रॉडक्टवर गॅरेंटी देण्याऐवजी वॉरंटीच देतात. वॉरंटीमध्येही ग्राहकाचे फारसे नुकसान होत नाही. मात्र, वॉरंटीचा योग्य फायदा घेता यायला हवा. Guarantee-Warranty
घेतलेल्या वस्तूचे योग्य बिल मिळाल्याची खात्री करा
इथे सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही महागडी वस्तू खरेदी करताना त्याचे बिल जरूर घ्या. यासोबतच ती वस्तू उघडल्यानंतर दुकानदाराची सही आणि त्यात ठेवलेल्या गॅरेंटी/वॉरंटी कार्डवर शिक्का घ्या. याशिवाय, मालाचे नुकसान झाल्यास आपल्याला गॅरेंटी/वॉरंटी अंतर्गत कंपनीकडे क्लेम करता येणार नाही.
वस्तू खरेदी करताना काय पहावे ?
जेव्हा तुम्ही बाजारातून एखादी वस्तू खरेदी कराल तेव्हा त्यावर लिहिलेल्या गॅरेंटी किंवा वॉरंटीकडे नक्की लक्ष द्या. मात्र हे लक्षात घ्या कि, ज्या प्रॉडक्ट्सवर जास्त काळ गॅरेंटी-वॉरंटी मिळते, त्याची क्वालिटी चांगली असते. तसेच ते मध्येच खराब झाले तरीही त्यावर काही खर्च करावा लागणार नाही.Guarantee-Warranty
ग्राहक मंचात केस दाखल करता येईल
गॅरेंटी-वॉरंटीच्या कालावधीत असूनही जर एखादी वस्तू खराब झाली आणि कंपनी ते दुरुस्त करण्यास टाळाटाळ करत असेल, तर आपल्याला ग्राहक मंचात तक्रार दाखल करता येईल. तेथे खटला भरण्यासाठी वकिलाची गरज नसते. यासाठी आपण स्वतः संपूर्ण घटना एका साध्या कागदावर लिहून ग्राहक मंचाकडे पाठवता येईल. यानंतर मंचाच्या वतीने संबंधित कंपनीला नोटीस बजावण्यात येईल. मात्र नोटीस देऊनही जर कंपनीने कोणतेही पाऊल उचलेले नाही, तर कंपनीविरोधात खटला सुरू होतो. Guarantee-Warranty
Guarantee-Warranty च्या अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://dea.gov.in/sites/default/files/govern_guarantee_policy_1.pdf
हे पण वाचा :
FD Rates : आता ‘ही’ सरकारी बँक FD वर जास्त व्याज देणार, नवीन दर तपासा
Yes Bank कडून ग्राहकांना धक्का, मुदतपूर्व FD काढण्याच्या दंडात केली वाढ
Bank Holidays : उद्यापासून सलग 3 दिवस बँका राहणार बंद !!!
3 IPL टीमकडून खेळलेल्या ‘या’ भारतीय खेळाडूवर गुन्हा दाखल
Bank FD Rates : FD उघडाताय… जरा थांबा !!! कोण-कोणत्या बँका जास्त व्याज देत आहेत ते पहा