पुणे रेल्वे स्टेशनवर आढळली संशयास्पद वस्तू?; पोलिसांनी तपासात दिला ‘हा’ प्राथमिक निष्कर्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सर्वत्र राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना आज पुण्यात एक खळबळजनक घटना घडली. ती म्हणजे पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर पोलिसांना एक संशयास्पद वस्तू आढळून आली. त्यानंतर स्टेशनवर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ स्टेशनवरील दोन स्थानके खाली केले. काही काळासाठी रेल्वेची वाहतूकही थांबावली. तसेच पोलिसांकडून ही वस्तू रेल्वे स्टेशनबाहेरच्या परिसरात नेण्यात आली. बॉम्ब शोधक नाशक पथकाने तपासणी केली असता ही संशयास्पद वस्तू स्फोटक नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. व ती नष्ट करण्यात आली.

आज पुण्याला काही तासांसाठी हादरवून सोडणारी घटना घडली. रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने परिसरासह अख्या पुण्यात हि बातमी वाऱ्यासारखी पसरली. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसही घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. खबरदारी म्हणून त्यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 पूर्णपणे रिकामे केले. संबंधित वस्तू ताब्यात घेत रेल्वे स्टेशनबाहेर नेण्यात आली. तसेच ती मोकळ्या अज्ञात स्थळी निकामी करण्यात आली.

सापडलेली वस्तू जिलेटीन किंवा डिटोनेटर नाही : अमिताभ गुप्ता

पुण्यातीळ रेल्वे स्टेशनवर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता रेल्वे स्थानकात दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “आज सकाळी वाजता रेल्वे पोलीस स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्राथमिक माहितीनुसार संबंधित वस्तू जिलेटीन किंवा डिटोनेटर नसल्याचे त्यांनी सांगितले.

नेमका काय घडला पुणे रेल्वे स्टेशनवर प्रकार ?

आज सकाळी पुणे पोलिसांना पुणे रेल्वे स्थानक परिसरात बॉम्बसदृश वस्तू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वॉड पथकसह घटनास्थळी दाखल झाले. खबरदारी म्हणून पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 रिकामे करण्यात आले. त्याचप्रमाणे बाहेरून पुणे रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या गाड्यांना यार्डमध्ये थांबवण्यात आले. संबंधित संशयास्पद वस्तू रेल्वे स्टेशनमधून बाहेर मैदानावर नेण्यात आली. तसेच ती निकामी करण्यात आली.