दिगंबर आगवणेंना फसवणूक प्रकरणात पोलिस कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | स्वराज पतसंस्थेची बदनामी करून वसुलीस गेलेल्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करणे तसेच जातीवाचक बोलण्याचे भासवून खोट्या तक्रारी दिल्याने दिगंबर आगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने या प्रकरणात दिगंबर आगवणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असून दोन बड्या नेत्यांमधील वाद कायद्याच्या कचाट्यात सुरू झाला आहे.

या बाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वराज पतसंस्था फलटण संस्थेचे कर्जदार दिगंबर रोहीदास आगवणे (रा. गिरवी, ता. फलटण) यांनी स्वराज पतसंस्थेकडे वखार व्यवसायासाठी 1 कोटी एवढे कर्ज मंजूर केलेले होते. या कर्ज प्रकरणापुर्वी संस्थेकडे पुर्वी रक्कम रुपये 15 लाख फक्त व रक्कम रु. 20 लाख रूपयांची दोन कर्ज खाती होती, ती आगवणे यांनी संपुर्णपणे वेळेत भरुन विश्वास संपादन केलेला होता. कर्ज मंजुर करते वेळी संस्थेतील नियमाप्रमाणे कर्जास तारण म्हणुन (मौजे सुरवडी, ता. फलटण, जि. सातारा) येथील गट नं. 48 / 2 क्षेत्र 04 हे 22 आर पैकी आरोपीचा असणारा हिस्सा 02 है 46 आर ही स्थावर मिळकत फिर्यादीने संस्थेस गहाणखत करून दिले होते. आगवणे यांनी तारण दिलेले गट नं. 48 / 2 याचे सात बारा सदरील फिर्यादी संस्थेच्या बोझ्याची नोंद फेरफार नं 3732 या नोंदी विरुद्ध शितोळे यांनी उपविभागीय अधिकारी फलटण यांच्याकडे हरकत घेतली व त्या वेळी फिर्यादी संस्थेस सदरील तारण मिळकतीचा वाद आहे. त्याबाबत फिर्यादीने आगवणे यांच्याकडे विचारणा केली असता तुम्ही काही काळजी करु नका मी पहातो काय असे सांगितले.

आगवणे याची गट नं. 48/2 या जमिनीची कायदेशीर मालकी ही त्याची नाही. तरी देखील फिर्यादी संस्थेची फसवणुक करण्याच्या दुष्ट हेतुने व फिर्यादी संस्थेस तारण दिलेले मिळकत ही किंमती मिळकत असल्याचे भासवुन खोटे गहाणखत करुन देवुन आगवणे यांनी फिर्यादी संस्थेची फसवणुक केली व पतसंस्थेचे आर्थिक नुकसान व फसवणुक केली. कर्ज रकमेस वसुलीतुन बगल देणेसाठी संस्थेचे माजी चेअरमन व संचालक मंडळ यांची वृत्तपत्र व इतर प्रसार माध्यमांद्वारे खोटी व बदनामीकारक वक्तव्य केली. त्यामुळे संस्थेबद्दल ठेवीदारांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली. थकीत कर्ज वसुलीसाठी संस्थेचे पदाधिकारी आगवणे यांच्याकडे गेलेवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ दमदाटी केली व अंगावर धावुन आले . तसेच परत जर कर्जाबाबत मला विचारले तर संस्थेचे सर्व संचालकांवर अँट्रसीटीचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली होती.

याबाबत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी फलटण यांचे न्यायालयात फौजदारी खटला क्र .177 / 22 प्रमाणे दाखल करणेत आला होता त्यावरुन मा . न्यायालया कडील जावक क्र . 3223/2022 दि . 11/04/2022 रोजी सदर प्रकरणाचा फौ.प्र . संहीता कलम 156 ( 3 ) प्रमाणे तपास करुन अहवाल सादर करणे बाबत आदेश दिल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात दिगंबर रोहीदास आगवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी शहर पोलीसानी अटक केली आहे.