हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । DigiLocker : आजकाल सर्व कामे ही ऑनलाईन पद्धतीने केली जातात. सध्याचे जग हे इंटरनेटचे आहे. तसेच इंटरनेटमुळे WhatsApp सारख्या इन्स्टंट मेसेजिंग App चा वापर देखील चांगलाच वाढला आहे. WhatsApp वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता WhatsApp द्वारे डिजीलॉकरही एक्सेस करता येणार आहे.
MyGov ने सोमवारी जाहीर केले की,”नागरिकांना आता WhatsApp च्या माध्यमातून MyGov हेल्पडेस्कवरील डिजिलॉकरच्या सर्व्हिसेस वापरता येतील. सरकारी सेवांमध्ये लोकांचा प्रवेश सुलभ करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.”
डिजिलॉकर हा डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत एक प्रमुख उपक्रम आहे, ज्याचा उद्देश लोकांना त्यांच्या डिजिटल डॉक्युमेंट्स वॉलेटद्वारे खऱ्या डॉक्युमेंट्स मध्ये एक्सेस देणे हा आहे. डिजीलॉकर सिस्टीम मध्ये सेव्ह केलेले डॉक्युमेंट्स ओरिजिनल डॉक्युमेंट्स सारखेच मानले जातात.
In a major initiative to make government services accessible, inclusive, transparent, and simple, @mygovindia announces that citizens will now be able to use the MyGov Helpdesk on WhatsApp to access the #Digilocker service. pic.twitter.com/h3s6BPRkGF
— All India Radio News (@airnewsalerts) May 23, 2022
यामध्ये DigiLocker खाते तयार करणे आणि ऑथेंटिफिकेशन करणे, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, व्हेईकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट यांसारखे डॉक्युमेंट्स डाउनलोड करणे यांचा समावेश आहे. आता देशभरातील WhatsApp युझर्स WhatsApp क्रमांक +91 9013151515 वर “नमस्ते” किंवा “हाय” किंवा “डिजिलॉकर” पाठवून चॅटबॉट एक्सेस करू शकतात.
Digilocker च्या अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.digilocker.gov.in/
हे पण वाचा :
Bank Holidays : जूनमध्ये 12 दिवस बँका राहणार बंद !!! सुट्ट्यांची लिस्ट पहा
Bollywood चे ‘हे’ पाच स्टार्स आपल्या बॉडीगार्डना देतात इतका पगार
Edible Oil Prices : खुशखबर !!! खाद्यतेलाच्या दरात घसरण, जाणून घ्या यामागील कारणे
New Hero Splendor+ Launch : देशात सर्वाधिक विकली जाणारी ‘ही’ मोटरसायकल नव्या रूपात लॉन्च