नवी दिल्ली । जी लोकं ऑनलाइन शॉपिंग करतात किंवा त्यांचा माल ऑनलाईन विक्री करण्याची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आगामी काळात ऑनलाइन व्यवसायातून ऑनलाइन शॉपिंगपर्यंत देशात मोठा बदल होणार आहे. अलीकडेच केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या DPIIT विभागाने ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स प्लॅटफॉर्म (Open Network Digital commerce Platform) लाँच करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी जास्त अधिकार असलेली सल्लागार समिती देखील स्थापन केली जात आहे.
यामध्ये सध्या मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांचे बंधक असलेले लहान विक्रेते आणि ग्राहकांना ना केवळ मुक्त केले जाईल तर आता ते मोठ्या डिजिटल बाजार (Digital Bazar) किंवा ओपन नेटवर्कवर व्यवसाय करण्यास आणि खरेदी करण्यास देखील सक्षम होतील. या ओपन नेटवर्कवर सर्वात लहान आणि मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांना व्यवसाय करण्याची सुविधा तर असेलच तसेच ग्राहकांनाही स्वस्त आणि चांगल्या प्रतीच्या वस्तू मिळणार्या कुठल्याही कंपनीकडून खरेदी करण्याचे स्वातंत्र्य मिळेल.
यासंदर्भात, अखिल भारतीय व्यापारी महासंघा (CAIT) चे राष्ट्रीय सरचिटणीस आणि सरकारच्या या प्रकल्पातील सल्लागार समितीचे सदस्य प्रवीण खंडेलवाल यांचे म्हणणे आहे की,” हे ओपन नेटवर्क त्याच्या नावाप्रमाणेच असेल. म्हणजेच तो एक डिजिटल बाजार असेल. या नेटवर्कमध्ये सामील होण्याचा फायदा म्हणजे ई-कॉमर्स कंपन्यांना जास्त प्रयत्न न करता देशभरातील व्यापारी आणि ग्राहकांची मोठी बाजारपेठ मिळू शकेल. यासह या प्लॅटफॉर्मशी संबंधित कोणत्याही कंपनीच्या विक्रेत्यांकडून ग्राहकांना त्यांच्या आवडीचे सामान खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध असेल.
आता ऑनलाइन शॉपिंगमध्ये ग्राहकांना हे कष्ट घ्यावे लागतात
खंडेलवाल स्पष्ट करतात की,”सध्या ग्राहकांना ते ज्या केवळ एका पोर्टलशी जोडले गेले आहेत फक्त त्याच पोर्टलवरून वस्तू खरेदी करता येतात. इतर पोर्टलवरून खरेदी करण्यासाठी त्यांना दुसर्या पोर्टलवर जावे लागते, तर या नेटवर्कवर ते कोणत्याही कंपनीकडून वस्तू किंवा सर्व्हिस खरेदी करण्यासाठी पूर्णपणे मोकळे आहेत. ग्राहकांना त्यासाठी पुन्हा पुन्हा पोर्टल बदलण्याची गरज भासणार नाही, परंतु ज्याप्रमाणे ते मोठ्या बाजारात कोणत्याही दुकानातून सामान घेतात, अगदी तशाच प्रकारे त्यांना इथल्या कुठल्याही कंपनीकडून वस्तू खरेदी करता येतील.”
यामुळे ई-कॉमर्सची रचना बदलू शकेल, छोट्या व्यावसायिकांनाही फायदा होईल
त्यांचे म्हणणे आहे की,” जर हा प्रयत्न यशस्वी झाला तर जगभरातील ई-कॉमर्स व्यवसायाची रचना बदलून ऑनलाइन व्यवसाय करणार्या बड्या कंपन्यांच्या मनमानीपणाला आळा बसेल आणि लहान व्यापारीसुद्धा अगदी सहजपणे या ओपन नेटवर्कचा फायदा घेऊ शकतील.
देशात 4 हजाराहून अधिक छोट्या-मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या ई-सिस्टमद्वारे ग्राहकांना वस्तू देत आहेत. त्याच वेळी, 500 पेक्षा जास्त लॉजिस्टिक कंपन्या विक्रेत्यांकडून ग्राहकांना ई-कॉमर्स वस्तू डिलिव्हरी करत आहेत. अशा 20 हजाराहून अधिक कंपन्या ई-कॉमर्सच्या माध्यमातून ट्रॅव्हल, हॉटेल्स, मेडिसिन, अनेक प्रकारची उपकरणे, रुग्णालये, ब्युटी सलून, हेल्थ क्लब, जिम, रेस्टॉरंट्स, फूड आणि इतर व्यवसायिक सेवांसह अनेक प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देत आहेत. याशिवाय लाखो लोकं ई-कॉमर्समध्ये विविध व्यवसाय आणि व्यावसायिक उपक्रम करीत आहेत.
कंपन्या किंवा व्यावसायिकांना ‘हे’ काम करावे लागेल
खंडेलवाल स्पष्टीकरण देतात की,” छोटासा व्यवसाय असो की मोठी कंपनी, आता प्रत्येकाने ई-कॉमर्ससाठी तयार केलेल्या मसुद्याच्या नियमांनुसार स्वत:चे रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक असेल आणि सर्व लोकांना ओपन नेटवर्कमध्ये सामील होऊन त्यांचा व्यवसाय वाढवण्याची समान संधी मिळेल. ओपन नेटवर्क हे देशातील व्यापारी आणि ग्राहकांना ई-कॉमर्सद्वारे जोडण्याचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे सिद्ध होईल.”
यासह, ओपन नेटवर्क प्रोटोकॉल अनेक मार्गांनी ग्राहकांसाठी फायदेशीर असल्याचे सिद्ध होईल. या नेटवर्कचे उद्दीष्ट ओपन नेटवर्कमधील मूल्य नियंत्रित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा फायदा करून एक इंटरऑपरेबल ओपन प्लॅटफॉर्म तयार करून ग्राहक, एप्लिकेशन डेवलपर्स, सरकार आणि व्यवसाय यांचे हित करणे हे आहे. ई-कॉमर्सद्वारे आपला व्यवसाय वाढवू इच्छित असलेल्या एमएसएमई आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी हे एक मोठे वरदान ठरेल.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group