मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ २४ जुलै रोजी (शुक्रवारी) प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित करावा अशी चाहत्यांची इच्छा होती. मात्र करोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर संध्याकाळी साडेसात वाजता सुशांतचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
विशेष म्हणजे प्रेक्षकांना हॉटस्टारवर मोफत म्हणजेच व्हीआयपी सबस्क्रीप्शन न घेता पाहता येणार आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक मुकेश छाबडाने याविषयीची माहिती दिली. ‘देशातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा चित्रपट मोफत आहे याचा मला आनंद आहे’, असं त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं होतं. डिस्ने प्लस हॉटस्टारचं व्हिआयपी सबस्क्रीप्शन वर्षभरासाठी ३९९ रुपये इतकी आहे. पण आता हे पैसे न भरताच प्रेक्षकांना सुशांतचा चित्रपट पाहता येणार आहे. नवीन प्रदर्शित होत असलेल्या चित्रपटांपैकी केवळ सुशांतच्याच चित्रपटाला ही सूट देण्यात आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”