दिलीप वळसे पाटील पुन्हा शरद पवार गटात जाणार? त्या ट्विटने चर्चाना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे हात मिळवणी केल्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसला असल्याचे दिसत आहे. यात राज्यामध्ये अजित पवार गटाचे मोजून एकच सीट निवडून आल्यामुळे तर अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये ही अस्वस्थता निर्माण झाली आहे. या घडामोडींमध्ये दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) मंत्री दिलीप वळसे पाटील पुन्हा शरद पवार गटात (Sharad Pawar Group) येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांना फुंकर मारलीये ती दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी केलेल्या ट्विटने

शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा विजय झाल्यानंतर पूर्वा वळसे पाटील यांनी अमोल कोल्हेंना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विट करत, “डॉ अमोल कोल्हे साहेब यांचा दणदणीत विजय; मनःपूर्वक अभिनंदन” असे म्हणले आहे. यासह त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा विजय झाल्यामुळे त्यांना देखील भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमुळे, पूर्वा पाटील या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या बाजूने विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरताना दिसतील, असे तर्क लावले जात आहेत.

त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील देखील शरद पवारांच्या गटात येण्यास इच्छुक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे पुढे जाऊन असे पाटील याबाबत नेमकी काय भूमिका घेतील, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी देखील एक मोठा गौप्यस्फोट केला होता. ज्यात, “अजित पवार गटातील 18 ते 19 आमदार आमच्या संपर्कात आहेत. येत्या 15 दिवसात दिसेल” असे म्हटले होते.