हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । मुंबई सेन्ट्रल भागात नेहमी खूप ट्रॅफिक असते.पण येणा-जाणाऱ्या सगळ्यांचे लक्ष हमखास जाते ते म्हणजे मराठा मंदिर.फक्त मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हे नाव परिचित आहे.हे थेटर काळानुरूप खूप जून आहे तरीही गेली अनेक वर्षे एका सिनेमाचं पोस्टर इथे बघायला भेटते आणि तो सिनेमा म्हणजे, ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’.
राज आणि सिमरनच्या या प्रेमकहाणीनं नव्वदच्या दशकात सगळ्यांनाच ‘याड’ लावलं होतं.
२० ऑक्टोंबर १९९५ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा २५ वर्षाचा झाला आहे.हा सिनेमा एवढा वर्ष थेटरात कसा काय टिकू शकतो याचं गणित सुटता सुटल नव्हत.काही जण म्हणायची प्रेक्षकांना काजोल आणि शाहरुख या जोडीने भुरळ घातली आहे, तर एकिकडे या सिनेमाची प्रेमकहाणी खूप सोबर अशी होती अशी चर्चा ऐकण्यात आली,पण या फक्त मैफिलीतल्या गप्पा होत्या.पण एक गोष्ट मात्र खरी आहे की,१००० आठवडे पूर्ण झाल्यानंतर सिनेमा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता पण लोकांच्या आणि चोप्राच्या आग्रहावरून सिनेमा कंटिण्यु राहिला.
या सिनेमाची पडद्यावरची गोष्ट जशी रंजक आहे, तशाच पडद्यामागच्या काही गोष्टीही मजेशीर आहेत
‘पलट… पलट.. पलट’ हा सीन हॉलिवूडमधल्या ‘इन द लाईन ऑफ फायर’ या चित्रपटामधून कॉपी करण्यात आला आहे.डीडीएलजेची कथा ऐकून शाहरुखने आदित्यला नकार दिला होता. पण, आदित्यनी शाहरुखची समजूत काढली. रोमँटिक भूमिका न साकारल्यास तू कधीच सुपरस्टार होऊ शकणार नाहीस, असं त्यानं समजावलं. त्यावर विचार करून शाहरुखने होकार कळवला. नाहीतर, सैफ अली खान राजच्या भूमिकेत दिसला असता.‘मेहंदी लगा के रखना’ या संपूर्ण गाण्यात काजोलनं नृत्य करावं असं कोरिओग्राफर सरोज खानचं मत होतं. पण, आदित्यला ते पटलं नाही. त्यानं गाण्याच्या शेवटीच सिमरनला नृत्य करू दिलं. फायनली सिनेमा बनला,आणि ‘डीडीएलजे’ने सगळ्यांना युरोपची सैर घडवली आणि पंजाबी संस्कृतीही दाखवली.
या सिनेमात नेमक खास तरी काय आहे?
तेव्हा आणि आता सुध्दा प्रत्येक वयात आलेल्या मुलांची इच्छा असते,एकदा तरी कोणती मुलगी आपल्याला बघून सिमरन सारखी पलटेल,आणि हा सीन प्रेक्षक कधीच विसरू शकत नाहीत.
मुळात प्रेमकहाणी तेव्हाच लोकांच्या मनावर राज्य करते जेव्हा ती हिरो हिरोईनच्या चेहऱ्यातुंतून आणि डोळ्यातून झळकते आणि शाहरुख आणि काजोल इथेच बाजी जिंकतात.आणि या दोघांची केमिसट्री सिनेमात अफलातून रंगत टाकते.
आदित्य चोप्रा यांनी जवळपास ३ वर्ष या सिनेमाच्या पटकथेवर काम केले. पण मूळ प्रश्न होता की या सिनेमाला नाव काय द्यायचं. मग किरण खेर यांनी नाव सुचवलं ते ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’.हे नाव सर्वांना प्रचंड आवडल.आणि विशेष म्हणजे सिनेमाच्या सुरुवातीला किरण खेर यांना क्रेडिट देखील देण्यात आलेलं आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ हा बॉलिवुडचा पहिला सिनेमा आहे ज्याचा लंडन येथे पुतळा बनणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’