Sunday, February 5, 2023

चष्मापासून तयार झालेले डाग ‘असे’ करा दूर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आजकाल लहानांपासून सगळ्या लोकांना चष्मा आहे. काही लोक फॅशन म्हणून चष्माच वापर करतात. पण बऱ्याच दिवसांपासून चष्मा वापरणाऱ्या लोकांना आपल्या डोळ्याखाली काळे डाग तयार होते. ते काळ डाग घालवण्यासाठी विशेष प्रयत्न केला जातो.काही जणांना चष्मा लावल्यामुळे नाकावर खूणा तयार होतात. त्यामुळे चष्मा काढल्यानंतर चेहरा खराब दिसतो. नाकावर, डोळ्यांच्या बाजूला असे वेगवेगळ्या चेहऱ्याच्या भागांवर चष्म्याच्या आकारानुसार डाग पडत असतात. बाहेरच्या काही प्रॉडक्ट मुळे डोळ्यांना खूप त्रास होऊ शकतो . डोळे हा आपला नाजूक अवयव आहे. त्यामुळे त्याची काळजी चांगल्या पद्धतीने घेतली पाहिजे.

घरगुती उपाय

- Advertisement -

मध – चष्म्याच्या खुणा कमी करण्यात मध फायदेशीर आहे. काही थेंब मध त्या ठिकाणी लावा. मध आणि लिंबू मिसळूनही तुम्ही लावू शकता. त्यामुळे ते डाग जाण्यास मदत होते.

बटाटा – बटाट्यामध्ये त्वचेसाठी फायदेशीर असलेले अनेक गुणधर्म असतात. यासाठी एका कच्च्या बटाट्याची साल काढून त्याचा रस काढून घ्या आणि २० मिनिटांपर्यंत चेहऱ्याला लावून ठेवा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या.

अ‍ॅलोवेरा – अ‍ॅलोवेराचा वापर करण्यासाठी सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर अ‍ॅलोवेरा जेल हातावर घेऊन डोळ्यांच्या आजूबाजूला लावून गोलाकार फिरवा. हि वस्तू खूप गुणकारी आहे. याचा वापर सर्व चेहऱ्याच्या ट्रीटमेंट साठी केला जातो.

गुलाबपाणी – गुलाब पाण्याचा उपयोग चेहऱ्याची सुंदरता वाढविण्यासाठी उपयोग करण्यात येतो. कापसाच्या मदतीने गुलाब पाणी चेहऱ्यावर लावा. काही वेळ चेहऱ्यावर ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका.

टोमॅटो -टोमॅटो, व्हिनेगर या पदार्थांच्या सहाय्याने डाग कमी करता येतात. हे पदार्थ स्किनवर लावताना विशेष काळजी घ्या. फक्त डागांवरच लावा. चेहऱ्याच्या इतर ठिकाणी लावू नका. कारण जर इतर ठिकाणी लावला तर ती त्वचा पूर्णतः जळू जाऊ शकते.