कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी शनिवारी कराडला भेट दिली. यावेळी आयुक्त म्हैसकर यांनी शासकीय विश्रामगृहात प्रशासकीय अधिकार्यांची बैठक घेऊन काही महत्वपूर्ण सूचनाही केल्या आहेत.
https://hellomaharashtra.in/maharashtra-news/how-karad-corona-patients-reached-upto-57-karad-corona-news/
कराड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. एकट्या कराड तालुक्यात कोरोनाचे तब्ब्ल ८६ रुग्ण आत्तापर्यंत सापडले आहेत. त्यामुळे पाहणी करण्यासाठी आयुक्त म्हैसकर यांनी कराड शहराला भेट दिली असल्याची माहिती मिळाली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी कृष्ण हॉस्पिटल ला भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच मलकापूर येथील अहिल्यानगरमधील कंटेनमेंट झोनची त्यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, आयुक्त म्हैसकर यांनी सर्व अधिकाऱ्यांची कराड विश्रामगृह येथे आढावा बैठक बोलावली होती. सदर बैठकीत आयुक्त म्हैसकर यांनी कृष्णा रुग्णालय, कराड उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत असणारे डॉक्टर्स, हॉस्पिटल्स, पोलीस कर्मचारी यांच्या कार्यपध्दतीची माहिती घेतली.
”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”