सातारा | सभासदांना विनंती आहे, बॅंकेच्या वाटचालीत योगदान आहे, अशा उमेदवारांना मतदान करावे. केवळ जागा अडविण्यासाठी किंवा सातारा जिल्हा बॅंक देशातील सहकारातील मोठी संस्था आहे, म्हणून काहीजण येवू इच्छितात. काहीजण मागच्या निवडणुकीत जागा अडविण्याठी बॅंकेत आले आहेत, अशांना आता घरी बसवावे अशी टिका आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
सातारा जिल्हा बॅंकेच्या संचालक निवडणकीसाठी आज सोमवारी दि. 25 रोजी सकाळी अर्ज भरण्यासाठी जाताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाऊसाहेब महाराज यांच्यानंतर संचालक, चेअरमन म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. गेली पाच वर्षे मला अध्यक्ष म्हणून सातारा जिल्हा बॅंकेत काम करण्याची संधी मिळाली. बॅंक राज्यात, देशात कायम एक नंबरला राहिलेली आहे. सध्या सर्व इच्छुकांना अर्ज भरण्यास सांगितले आहे. जागा वाटाप झाल्यानंतर अर्ज माघारी घेण्यात येणार आहे, त्यामुळे बंडखोरी होणार नाही.
उदयनराजेंचा सोबतचा निर्णय माझ्याकडे नाही
या निवडणुकीत मी आणि राष्ट्रवादी मिळून जे पॅनेल होत आहे, ते 100 टक्के विजयी होणार आहे. कुणी काही म्हणाले किंवा कितीही टिका टिप्पणी केली. तरी त्याचा फायदा होणार नाही. उदयनराजेंना सोबत घेण्याचा निर्णय शरद पवार, अजित पवार आणि रामराजे नाईक- निंबाळकर हे करतील.