माझ्या मूळ गावी जा आणि जन्मदाखला तपासा; वानखेडेंचे मलिकांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकारणानंतर राज्यातील वातावरण तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि ncb अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील आरोप- प्रत्यारोप सुरूच आहेत. याच दरम्यान, नवाब मलिक यांनी समीर यांच्या लग्नाचा जुना फोटो ट्विट करत पहचाना कोण असा सवाल केला होता त्यावर समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया देत मलिकांवर पलटवार केला आहे.

वानखेडे म्हणाले की, २००६ मध्ये माझं लग्न झालं होतं आणि कायदेशीररित्या घटस्फोट घेऊन मी दुसरं लग्न केलं, ज्या महिलेसोबत मी संसार केला नाही त्या महिलेचा फोटो वापरून कुटुंबावर हल्ला केला जातोय. माझ्यावर कितीही शिंतोडे उडवायचे ते उडवा. तपास भरकटवण्याचा प्रकार आहे. अतिशय खालच्या दर्जाची चिखलफेक सुरू आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

तसेच आपल्या बाबत खोटे दस्तावेज प्रसिद्ध केले जात आहेत. आपण या प्रकाराला चॅलेंज करणार आहोत. माझ्या मूळ गावी जा आणि तपासा. आपला जो जन्म दाखला सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जात आहे, तो खोटा आहे” असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.

मलिक नेमकं काय म्हणाले होते-

‘पहचान कौन’ असं म्हणत नवाब मलिक यांनी NCB अधिकारी समीर दाऊद वानखेडे यांचा लग्नातील फोटो ट्वीटरवर शेअर करुन आणखी खळबळ उडवून दिली आहे. ‘यहाँसे शुरु हुआ फर्जीवाडा’ असं म्हणत दुसरं ट्वीट करत समीर दाऊद वानखेडे यांचे जातप्रमाणपत्र शेअर केले आहे

You might also like