हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Credit Card चा वापर दिवसेंदिवस वाढतच आहे. क्रेडिट कार्ड कंपन्याकडून कडून ग्राहकांना अनेक आकर्षक ऑफर्स देखील दिल्या जातात. अशा कंपन्याकडून सुरुवातीला नवीन क्रेडिट देताना कमी क्रेडिट मर्यादेसाठी मान्यता दिली जाते. मात्र नंतर कार्डधारकाचे रीपेमेंट आणि इनकम ग्रोथ लक्षात घेऊन क्रेडिट कार्डचे लिमिट वाढवण्याची ऑफर दिली जाते. मात्र, क्रेडिट कार्डचे लिमिट वाढल्यानंतर जास्त खर्च केला जाऊन कर्जाच्या जाळ्यात अडकण्याची भीती देखील असते. चला तर मग क्रेडिट लिमिट वाढवण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत ते समजून घेऊयात …
क्रेडिट स्कोअर सुधारेल
आपल्या क्रेडिट स्कोअरचे कॅल्क्युलेशन करताना आपला Credit Utilization Ratio तपासा. हा रेशयो कार्ड धारकाद्वारे वापरल्या जाणार्या एकूण क्रेडिट मर्यादेचे प्रमाण असते. सामान्यत: क्रेडिट कार्ड कंपन्या CUR ला 30 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास कर्जाचे लक्षण मानतात. म्हणूनच, क्रेडिट लिमिट वाढण्याने आपला क्रेडिट स्कोअर सुधारू शकतो.
जर तुमची सध्याची क्रेडिट कार्ड कंपनी तुमची क्रेडिट कार्ड लिमिट वाढविण्यास नकार देत असेल तर इतर कार्ड जारी कंपन्या कडे क्रेडिट कार्डच्या वाढीव लिमीटसाठी अर्ज करता येईल.
उदाहरणार्थ, समजा आपल्या क्रेडिट कार्डाची मर्यादा 1 लाख रुपये असेल आणि आपण दरमहा सुमारे 50 हजार खर्च करत असाल. तर या प्रकरणात आपला CUR 50 टक्के असेल. आता जर आपली सध्याची कंपनी क्रेडिट कार्डची मर्यादा 1.7 लाख रुपयांपर्यंत वाढवित असेल तर आपला CUR 29 टक्क्यांपर्यंत खाली येईल. त्याचप्रमाणे जर आपण क्रेडिट कार्ड 70 हजार रुपयांच्या जास्त क्रेडिट मर्यादेसह ठेवले तर आपल्या CUR वरही तोच परिणाम दिसून येईल.
आर्थिक संकटाला सामोरे जाणे सोपे होईल
क्रेडिट लिमिट वाढल्यामुळे आर्थिक संकटात मदत होईल. नोकरी जाणे, आजारपण, अपघात, अपंगत्व इत्यादी आर्थिक संकटामध्ये हा इमर्जन्सी फंड म्हणून देखील काम करू शकते.
कर्ज मिळण्याची शक्यता जास्त
वाढीव क्रेडिट लिमिटमुळे आपल्याला जास्त कर्ज मिळवता येईल. हे लिमिट सामान्यत: क्रेडिट कार्ड धारकाच्या क्रेडिट लिमिट ऐवजी स्वीकारल्या जातात. इथे हे लक्षात घ्या कि, Credit Card वरील कर्जे सहसा (Loan Against a Credit Card) प्री-अप्रूव्ड असतात.
कर्जाच्या जाळ्यात अडकण्याची भीती
Credit Card चे लिमिट वाढवल्यानंतर आपला खर्च देखील वाढेल. मात्र जर त्याचा उपयोग शहाणपणाने केला गेला नाही तर आपण कर्जाच्या सापळ्यात अडकू शकाल.
जास्त व्याज द्यावे लागेल
जर आपण दर महिन्याला आपले बिल भरले नाही तर आपल्या थकबाकीवर जास्त व्याज द्यावे लागेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.axisbank.com/retail/cards/credit-card
हे पण वाचा :
Income Tax Return भरण्यासाठी कोण-कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत??? समजून घ्या
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घट, आजचे दर तपासा
अदानी ग्रुपच्या ‘या’ Multibagger Stock ने 4 वर्षात दिला 17 पट नफा !!!
FD Rates : आता ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेने देखील FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीनदर तपासा
आता नॉन-ब्रँडेड तांदूळ अन् मैद्यावरही द्यावा लागणार 5 टक्के GST