अनर्थ टाळला ः सातारा- पुणे महामार्गावर शिरवळ येथे पेट्रोलच्या टँकरला आग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

राष्ट्रीय महामार्गालगत शिरवळ फुल मळा लगतचा रस्त्यावर 25 हजार लिटर क्षमतेचा भरलेला रिलायन्सचा पेट्रोलच्या टँकरला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ माजली
घटनास्थळी शिरवळ पोलीस पांडुरंग हजारे यांनी उपस्थित राहून दीड तासाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री साडेअकराच्या सुमारास सातारा -पुणे महामार्गावरील शिरवळ येथील मुख्य हायवेवरच अचानक 25 हजार लिटर क्षमतेचा टॅंकरचा टायर फुटला. टायर फुटल्याने टँकरला आग लागली. बघता- बघता आग मोठ्या प्रमाणात वाढू लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरामध्ये एकच पळापळ सुरू झाली. परिसरात पेट्रोलच्या टँकरला लागलेली आगीची बातमी वाऱ्यासारखी पसरली.

घटनास्थळावर तात्काळ शिरवळ पोलिसांनी वाई, भोर व स्थानिक शिरवळच्या एमआयडीसीतील अग्निशामक बंब पाचारण केले. आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू केला. टँकरमध्ये 25 हजार लिटर पेट्रोल होते. त्यामुळे कोणत्या क्षणी काय करेल, याची गॅरंटी कोणीच देऊ शकत नव्हतं. मात्र दैव बलवत्तर होतं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, वेळीच आग विझवण्यात पोलिसांना यश आल्याने भविष्यातील मोठा अनर्थ टळला. पोलिसांचे उपस्थितांनी आभार मानले.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment