कराडात 200 होमगार्डंना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पावसाळ्यात नेहमीच चक्रीवादळ, अतिवृष्टी, पूरस्थिती, भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्ती कधी उद्भवतील याचा काही नेम नसतो. दुर्दैवाने अशा घटना घडल्याच तर त्या ठिकाणी NDRF, SDRF ची पथके पोहचेपर्यंत प्राथमिक स्तरावर झटपट मदतकार्य सुरू करता यावे. यासाठी जिल्ह्यातील गृहरक्षक (होमगार्ड) दलास आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यासाठी शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यापुढे आपत्कालीन परिस्थितीत होमगार्ड युद्धपातळीवर मदतकार्य करणार आहेत. त्यासाठी जवानांना प्रशिक्षित करण्यास सुरुवात करण्यात आली असुन कराडात 16 ते 20 दरम्यान हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामधील महत्वाचा भाग म्हणजे पूरस्थितीत उध्दभवल्यानंतर करावयाच्या उपयोजनांचे प्रशिक्षण आज कराड येथील प्रीतीसंगमावर देण्यात आले. प्रशिक्षण शिबिरात 200 हून अधिक होमगार्ड सहभागी झाले आहेत.

यावेळी जिल्हा अपर पोलिस अधिक्षक अजित बोऱ्हाडे, राज्य आपत्ती प्रतिसाद पथक (SDRF) प्रमुख सूनिल जगताप, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख देवीदास ताम्हाणे, जिल्हा गृहरक्षक दलाचे प्रभारी समादेशक अमोल जंगम, उपविभागीय पो. अधिकारी डॉ. रणजित पाटील, पो.नि बी. आर. पाटील, कराडचे नायब तहसिलदार आनंदा देवकर, पाटणचे नायब तहसिलदार प्रशांत थोरात, कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, कराड पाटणचे मंडलाधिकारी, तलाठी उपस्थित होते. या शिबिरात २० मेपर्यंत आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विविध पैलूचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

आपत्ती निवारणात गृहरक्षक दलाचा फायदा होईल; अपर पो. अधिक्षक बोऱ्हाडे

सातारा जिल्हा आपत्तीप्रवण जिल्हा आहे. गतवर्षी जिल्ह्यात महापुरामुळे मोठं नुकसान सहन करावे लागले होते. त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील 200 होमगार्ड जवानांना आपत्ती निवारण प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तसेच सातारा जिल्हा पोलीस दलच्या मदतीने हे प्रशिक्षण 16 ते 20 मे दरम्यान सुरू करण्यात आले असून या प्रशिक्षण शिबिरातून प्रशिक्षित झालेल्या होमगार्ड जवानांचा निश्चितच फायदा होणार आहे. जिल्ह्यात दुर्दैवाने आपत्ती आलीच तर गृहरक्षक दलाचे जवान मदतीला धावून येणार आहेत. त्यामुळे या प्रशिक्षणाचा नक्कीच फायदा होणार असल्याची असल्याचे जिल्हा अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी सांगितले.

Leave a Comment