कृष्णा हॉस्पिटलमधून 7 कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यातील एकूण 7 कोरोनामुक्त रूग्णांना आज कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 177 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पाटण तालुक्यातील नवसरी येथील 60 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय महिला, नवसरवाडी येथील 22 वर्षीय युवक, 25 वर्षीय युवक, तामिनी येथील 25 वर्षीय पुरुष, कालेवाडी येथील 21 वर्षीय युवक आणि शिरवळ पोलीस स्टेशन येथील 30 वर्षीय पुरुष हे रूग्ण गेले काही दिवस कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वार्डमध्ये उपचार घेत होते. त्यांचे उपचारनंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, राजू देशमुख, डॉ. सुजाता कानेटकर, डॉ. व्ही. सी. पाटील यांच्या हस्ते कोरोनामुक्त रूग्णांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील, रोहिणी बाबर यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.

शिरवळ येथील पोलिस कर्मचारी कोरोनामुक्त

शिरवळ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या 30 वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याला नाकाबंदीच्या निमित्ताने ड्युटीवर असताना कोरोनाची बाधा झाली. त्यांच्यावर कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना वॉर्डमध्ये उपचार सुरू असते. कृष्णा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केलेल्या उपचारांमुळे आणि पोलिस दलातील अधिकारी व माझ्या सहकाऱ्यांनी दिलेल्या धीरामुळे मी या कोरोनाच्या संकटावर यशस्वीपणे मात करू शकलो, असे उद्गार या पोलिस कर्मचाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना काढले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment