हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सूक्ष्मजीव जगात प्रत्येक ठिकाणी अस्तित्वात असतात . प्रत्येक सूक्ष्मजीवाचे परिसंस्थेत महत्वाचे स्थान आहे. अश्याच एका सूक्ष्मजीवाचा शोध आगरकर संशोधन संस्थेच्या शाश्त्रज्ञानी घेतला आहे. हा सूक्ष्मजीव रत्नागिरीतील आरवली येथील गरम पाण्याच्या झऱ्यात असलेल्या पाण्यात सापडला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या जिवाणूमध्ये हायड्रोजन निर्माण करण्याची (Hydrogen-Producing Bacteria) क्षमता आहे.
सूक्ष्मजीव गरम पाण्यातील झऱ्यात अस्तित्वात :
आगरकर संशोधन संस्थेच्या शाश्त्रज्ञानी केलेल्या संशोधनाची माहिती आर्काईव्ह ऑफ मायक्रोबायोलॉजी’ या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आली आहे. हा सूक्ष्मजीव गरम पाण्यातील झऱ्यात अस्तित्वात असून त्याला 45-50 ° C तापमानावर वाढवणे शक्य आहे. हा सूक्ष्मजीव शेतातील पिकांच्या अवशेषवर रासायनिक प्रक्रियेत भाग घेऊन हायड्रोजन वायू बनवतो. हा जिवाणू anaerobic lignocellulose-degrading वंशाचा Lachnospiraceae परिवारात यांचा समावेश होत असून स्पोरॅनेरोबियम हायड्रोजेनिफॉर्मन्स ( Sporanaerobium hydrogeniformans ) असे ह्या नवीन शोधलेल्या जिवाणूचे नाव आहे.
इथेनॉल तयार करण्याची देखील क्षमता :
या जीवाणूमध्ये हेक्सोज आणि पेंटोज साखरेला एकाच वेळी वापरण्याची, हायड्रोजन वायू आणि एसिटिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड आणि इथेनॉलसह मोठ्या प्रमाणात उपउत्पादने बनवण्याची अद्वितीय क्षमता आहे. साखरेचा हा दुहेरी वापर औद्योगिक जैवइंधन उत्पादनासाठी एक महत्त्वाचा भाग आहे. या सूक्ष्मजीवामुळे जनूकीय संशोधनाने विविध साध्या आणि जटिल सब्सट्रेट्सचे हायड्रोजन आणि इथेनॉलमध्ये रूपांतर करण्यासाठी एक विशेष रासायनिक मार्ग देखील उघड केला आहे.
संचालक ढाकेफाळकर यांनी सांगितले संशोधनाचे महत्व:
आगरकर संशोधन संस्थेचे संचालक डॉ. पी. के. ढाकेफाळकर यांनी सांगितले, ”या संशोधनामुळे हायड्रोजन निर्मितीच्या अनुषंगाने ऊर्जा क्षेत्रात एक नवी दिशा उपलब्ध झाली आहे. वेगवेगळ्या परिसंस्थेत विविध सूक्ष्मजीव आढळतात.जिवाणू आपल्या चयापचय प्रक्रियेतून हायड्रोजन वायूचे उत्पादन करू शकतो. सध्या जैव ऊर्जा संशोधनावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. यामध्ये इंधनासाठी मिथेन आणि हायड्रोजन या दोन पर्यायांवर अधिक भर दिला जात आहे. जिवाणूंच्या माध्यमातून हायड्रोजन निर्मिती सक्षम पर्याय आहे. तर हे जिवाणू शेतीतील अवशेषांमध्ये प्रामुख्याने आढळून येतात. या नव्या जिवाणूमुळे हायड्रोजन निर्मितीला बळ मिळणार आहे.