Diseases Increases In Men After Age Of 30 | वयाच्या 30 नंतर पुरुषांमध्ये या गंभीर आजारांचा धोका वाढतो, जाणून घ्या सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Diseases Increases In Men After Age Of 30 | आज-काल समस्या खूप कमी वयातच चालू होतात. अगदी वयाच्या 30 वर्षानंतर देखील व्यक्तीला आरोग्याच्या संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपल्या वयात आपल्याला स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आजकाल जीवनशैली खूप बदलली आहे. खाण्या पिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. त्यामुळे अनेक व्यक्ती वयाच्या 30 नंतरच अनेक रोगांना बळी पडतात. मग ते स्त्री असो किंवा पुरुष असो ३० वर्षे ओलांडली की त्यांच्या शरीरात अनेक बदल होतात. त्यांच्या शरीरात पोषक तत्वाची कमतरता निर्माण होते. त्यामुळे स्नायू लवचिक होतात आणि हाडे देखील कमकुवत होतात. आज आपण वयाच्या 30 नंतर पुरुषांना कोणत्या आजारांना बळी पडावे लागते याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या रोगांचा 30 नंतर धोका वाढतो | Diseases Increases In Men After Age Of 30

प्रोस्टेट कर्करोगाचा धोका

आज काल कर्करोगा मोठ्या प्रमाणात पसरत चालला आहे. काही पुरुषांमध्ये कर्करोगाची लक्षणे लवकर दिसतात. म्हणजे रात्री झोपताना जास्त लघवी होणे, लघवी करताना जळजळ होणे अशी लक्षणे असल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांना नक्की भेट द्या.

स्नायूंची लवचिकता

वयाच्या 30 नंतर पुरुषांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. यावेळी त्यांचे स्नायू आकुंचन पावतात त्यामुळे कधी कधी तुम्हाला खूप वेदना होतात अशा परिस्थितीत तुम्ही व्यायाम किंवा योगाची देखील मदत घेऊ शकता.

हाडे कमकुवत होणे

वयाच्या तिशीनंतर (Diseases Increases In Men After Age Of 30)शरीरातील कॅल्शियम आणि विटामिन डी ची कमतरता भासू लागली लागते. त्यामुळे शरीरातील हाडे कमकुवत होतात आणि थोड्याशा तरी दुखापत झाली तरी फ्रॅक्चर होऊ शकते. अशा वेळी तुम्ही कॅल्शियम आणि विटामिन डी शी संबंधित असणाऱ्या गोष्टींचे सेवन करणे खूप गरजेचे आहे.

झपाट्याने वजन वाढणे

या वयानंतर आपल्या शरीराचा आकार वाढतो. आपली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी चुकीच्या असल्यामुळे शरीरातील चरबी वाढते आणि 30 नंतर अचानक आपल्या शरीराची वाढ होते.

हृदयासंबंधी समस्या | Diseases Increases In Men After Age Of 30

वयाची तिशी ओलांडण्यानंतर लोकांच्या हृदयाची कार्यक्षमता अचानक कमी होते आणि रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होते. रक्तदाबाच्या समस्येलाही तुम्हाला सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही व्यायामावर लक्ष दिले पाहिजे आणि तुमच्या डॉक्टरांची देखील भेट घेतली पाहिजे.