आदित्य ठाकरेंच्या वाढदिवशी दिशा पटानीचं खास ट्विट; म्हणाली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील कमी वयातील आमदार अशी ओळख असणारे तरुण नेते म्हणजे आदित्य ठाकरे होय. लहानपणापासूनच राजकीय वातावरणात राहिल्यामुळे खूप लवकर त्यांनी राजकीय वाटचालीस सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील तमाम तरुणवर्ग त्यांचा चाहता आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रथम प्रयत्नातच मोठ्या फरकाने ते विधानसभेवर निवडून आले होते. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. राज्यभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणी हिनेदेखील आपल्या ट्विटर अकॉउंटवरून आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

‘आदित्य, वाढदिवसाच्या शुभेच्छा, आहेस तसाच अमेझिंग राहा आणि चमकत राहा,’ अशा आशयाचं ट्विट करत तिने आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासोबत एकदा डिनरला गेल्यापासून तिच्या आणि आदित्य ठाकरे यांच्या नात्याविषयी बरीच चर्चा सुरू आहे. अनेकदा आदित्य यांना दिशाविषयी विचारलं गेलं आहे पण आदित्य यांनी आणखीही उघड-उघड त्यांच्या नात्याविषयी सांगितलेलं नाहीये.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आपला वाढदिवस अतिषय साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमांचं नियोजन करू नये तसंच समाजातील दुर्बल घटकांना मदतीचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. दिशा पटाणी हिने शुभेच्छा दिल्यामुळे आता परत आदित्य ठाकरे आणि दिशा पटाणी यांच्या नात्याबद्दल चर्चेला पुन्हा एकदा उधाण येईल. दिशा पटाणी आणि टायगर श्रॉफ यांच्या नात्याचीही चर्चा होती. मात्र त्यांचे ब्रेकअप झाल्याच्याही बातम्या आल्या होत्या.