हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : ‘ वाढत्या कोरोनाला उपाय म्हणून लॉकडाऊन हा पर्याय नाही. लॉकडाऊन असताना सुद्धा रुग्ण संख्या वाढत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनला माझा विरोध राहणारच आहे. त्याचबरोबर सद्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मागील पाच वर्षात सत्तेत होते. हे ठाकरे सरकार बरखास्त करावं, हे सरकार क्रिमिनल आहे, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पुणे येथे सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भेट देत माहिती घेतली.
यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे हे मागील पाच वर्षात भाजपबरोबर सत्तेत होते. उद्धव ठाकरे यांना माहिती नाही असे नाही. पण त्यांना कणा नाही. हे सरकार तत्काळ बरखास्त करावं, हे सरकार क्रिमिनल आहे. या सरकारच्या ऐवजी नवीन सरकार यायला हवे. वास्तविक सरकारने स्वतः जम्बो कोविड सेंटर चालवायला घेणे गरजेचे आहे,
मधांतरी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपाल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली होती. तसेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणीहि आंबेडकर यांनी केली होती. “महाराष्ट्रात सध्या राजकारणातील गुन्हेगारी घटक आणि प्रशासनातील गुन्हेगारी घटक एकत्र येऊन राज्याला चालवत असल्याचं दिसत आहे. अनेक गावांमध्ये आदिवासी, अनुसूचित जातींच्या लोकांची हत्या केली जात आहे. पण त्याची साधी चौकशी नाही अशी परिस्थिती आहे,” अशी टीकाहि प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केली होती.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in