सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा बस आगारातील संपात सहभागी कर्मचाऱ्यांना बालाजी ट्रस्ट आणि गुरुकुल स्कूल यांच्यामार्फत आंदोलक एसटी कर्मचारी यांना जीवनावश्यकचे किटचे वाटप करण्यात आले. यावेळी बालाजी ट्रस्टचे राजेंद्र चोरगे, जेष्ठ पत्रकार शरद काटकर यांच्यासह सहकारी उपस्थित होते.
सातारा येथे गेल्या महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा शासनात विलनीकरण करण्यासाठी संप सुरू आहे. डिसेंबर महिन्यात शासनाकडून संपकरी कर्मचाऱ्यांना पगार देण्यात आलेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना बालाजी ट्रस्ट व गुरूकुल स्कूलकडून जीवनावश्यक वस्तूंची भेट देण्यात आली.
यावेळी राजेंद्र चोरगे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागणीसाठी संप केला आहे. गेल्या 45 दिवसापासून हा संप त्याच्या न्याय, हक्कासाठी सुरू आहे. भविष्यासाठी हा संप गरजेचा आहे. गोरगरिबांपासून सर्वांनीच एसटी बसमधून प्रत्येकाने प्रवास केला आहे. तेव्हा समाजातील प्रत्येकाने कर्तव्य भावनेतून या संपातील एसटी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.