हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अंगणात लवकरच सनई चौघड्याचा आवाज घुमणार आहे. कारणही तसंच आहे. मंत्री देसाई यांचे चिरंजीव यशराज देसाई यांचं लग्न ठरलं आहे. यशराज देसाई यांचं एम. टेकपर्यंतच शिक्षण झालं असून त्यांच्या होणाऱ्या अर्धांगिनी या डॉक्टर आहेत. यशराज देसाई यांचा विवाह इंद्रजीत निंबाळकर यांच्या कन्या डॉ. वैष्णवी निंबाळकर यांच्यासोबत ठरला आहे.
विशेष म्हणजे गेल्याच वर्षी यशराज देसाई यांच्यावर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर आता यशराज देसाईंवर कौटुंबिक जबाबदारी येणार आहे. यशराज देसाई यांच्या होणाऱ्या पत्नी वैष्णवी निंबाळकर यांचं एमबीबीएसचं शिक्षण झालं असून त्या डॉक्टर आहेत.
शंभूराज देसाई यांचे वडील आणि यशराज देसाई यांचे पणजोबा दिवंगत लोकनेते बाळासाहेब देसाई हे खूप बडे प्रस्थ होते. राज्यात आजही त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. ते राज्याचे शिक्षणमंत्री, गृहमंत्री आणि सांस्कृतिक मंत्रीदेखील होते. तसेच शंभूराज देसाई महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहराज्यमंत्री होते. शंभूराज देसाई सध्या राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.
लग्नाची ‘ही’ आहे तारीख
पाटणच्या देसाई घराण्यात डॉक्टर वैष्णवी निंबाळकर यांचा जानेवारी महिन्यात गृहलक्ष्मी म्हणून प्रवेश होणार आहे. यशराज आणि डॉ. वैष्णवी यांचा विवाह 28 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. पाटणच्या दौलत नगर येथील कसबे मरळी येथे हा विवाह पार पडणार आहे.
यशराज देसाई एक उत्तम लेखक…
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचे सुपुत्र यशराज देसाई हे एक उत्तम लेखकही आहरेत. कारण त्यांनी ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’ या पुस्तक लिहले असून
गतवर्षी 17 मार्च रोजी त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’ या इंग्रजी पुस्तकाच्या माध्यमातून आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात जीवनाकडे पाहण्याच्या अनोख्या सम्यक दृष्टीचा परिचय तसेच आभासी आणि वास्तव जगातला तोल, बॅलन्स कसा सांभाळायचा, याचे एक संवेदनशील, अभ्यासू चिंतन ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’ या पुस्तकात मांडले आहे.